तरुण भारत

शिरोडय़ात कोविड केअर सेंटरला विरोध पोलिसांचा ग्रामस्थावर लाठीचार्ज दहाजणांना अटक

रात्री उशिरापर्यंत तणाव

प्रतिनिधी / फेंडा

मडगाव कोविड इस्पितळ येथील प्रकृती सुधारत असलेल्या कोरोना रूग्णांना काराय-शिरोडा येथील इस्पितळात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जाहीर होताच काल रविवारी येथील ग्रामस्थांनी जोरदार विरोध करीत घोषणाबाजी केली. कोरोना संशयितांना शिरोडय़ात ठेवू नये अशी मागणी करत जोरदार निदर्शने केली.  उपजिल्हाधिकारी केदार नाईक यांनी पोलिसांना लाठी चार्जचा आदेश दिल्यानंतर परिस्थती नियंत्रणात आली. याप्रकरणी दहाजणांना ताब्यात  घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यत घटनास्थळी तणावाचे वातावरण होते.

फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दहाजणामध्ये साविक नाईक (21, वाजे), जुजे फर्नाडीस (49, शिरोडा), जॉन मार्टीस (60), ऍनाक्तेटो आगुस्तीनो (31), शिवानंद नाईक (53, वाजे), पीटर प्रुझ (35, काराय), कामिल फर्नाडीस (40,काराय), मयुर परवार (23, आनंदवाडी), आग्नेलो पुझ (42, काराय) तसेच एका महिलेचा समावेश आहे.

कोरोनाच्या शून्य लक्षणाच्या रूग्णाची रवानगी

ज्या संशयितांना कोरोनाची शून्य लक्षणे दिसत आहेत त्यांना काराय शिरोडा सरकारी इस्पितळात हलविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सचिव निला मोहनन यांनी दिली होती. त्यानंतर कोरोनाची धास्ती घेत काल रविवारी दुपारपासून येथील ग्रामस्थ विरोध करीत इस्पितळाबाहेर मोठय़ा संख्येने जमले होते. 

आमदार सुभाष शिरोडकर यांनी घटनास्थळी हजर राहून संतप्त ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला, संतप्त ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिले. काराय येथे येणाऱया ओपीडी रूग्णांची तपासणीची व्यवस्था कामाक्षी आयुर्वेदीक येथे करण्यात आलेली आहे. मात्र आंदोलनकर्ते कोणतीच बाजू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. उपजिल्हाधिकारी केदार नाईक, मामलेदार, पोलिस निरीक्षक मोहन गावडे पोलिस फौजफाटय़ासह घटनास्थळी हजर होते.

Related Stories

काजूसाठी 200 ते 250 रुपये दर मिळावा

Omkar B

संजीवनी साखर कारखाना बंद होणार

tarunbharat

गोव्यातील बेकारीचा दर वाढला

Amit Kulkarni

वास्कोतील भयानक स्थितीला सरकारच जबाबदार

Patil_p

चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानात महाशिवरात्री मर्यादित स्वरूपात

Amit Kulkarni

आपचा एकही आमदार पक्षातून फुटणार नाही

Patil_p
error: Content is protected !!