तरुण भारत

श्रम मंत्रालयातील 11 जणांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच आता दिल्लीतील श्रम मंत्रालयातील 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Advertisements


मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्या नंतर श्रम शक्ती भवन सॅनिटाईज करण्यासाठी चार आणि पाच जूनला बंद ठेवण्यात आले होते तसेच स्टाफ मधील अन्य कर्मचाऱ्यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली. 


पुढे ते म्हणाले, यामध्ये मंत्रालयातील एकूण 11 जण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये एक सहसचिव, एक स्टेनोग्राफर, एक मुख्य सचिव, एक सचिव, सहा कार्यकारी अधिकारी आणि एका ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच या भवनात ऊर्जा आणि जल शक्ती मंत्रालयाचे कार्यालय देखील आहे. ही कार्यालये देखील निर्जंतुकीकरण करण्यासाठी बंद ठेवण्यात आली असून अजून दोन दिवस कर्मचारी घरूनच काम करणार आहेत. 

Related Stories

प्रजासत्ताक दिन : फ्लाय पास्टमध्ये अपाचे हेलिकॉप्टरचा सहभाग

Patil_p

भारतात मागील 24 तासात 29,429 नवे कोरोना रुग्ण, 582 मृत्यू

datta jadhav

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशी आयोगाने ठोठावला २५ हजारांचा दंड

Abhijeet Shinde

भारतीय सैनिक चीनच्या ताब्यात नव्हते…

datta jadhav

मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Abhijeet Shinde

बाधितांचा आकडा नियंत्रणाबाहेर

Patil_p
error: Content is protected !!