तरुण भारत

न्युझीलंड आता कोरोना संसर्गमुक्त

17 दिवसांपासून नवा रुग्ण नाही : सोशल डिस्टन्सिंग सक्ती हटणार : जगभरात 71,10,306 कोरोनाबाधित

जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 4,06,474 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाधितांचा आकडा 71,10,306 वर गेला आहे. आतापर्यंत 34,69,010 जण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न आणि आरोग्य मंत्रालयानुसार देश आता संसर्गमुक्त झाला आहे. देशात 22 मेपासून नवा रुग्ण सापडलेला नाही. देशात लागू निर्बंध आता हटविले जाणार आहेत. अवघड काळात सरकारला साथ दिल्याबद्दल लोकांचे आभार मानत असल्याचे जेसिंडा यांनी म्हटले आहे. न्युझीलंडमध्ये एकूण 1,154 रुग्ण सापडले असून यातील 22 जणांचा मृत्यू ओढवला आहे.

Advertisements

महामारीवर नियंत्रण

न्युझीलंडमध्ये 22 मेनंतर नवा बाधित सापडलेला नाही. देशात आता कुठलाच ऍक्टिव्ह रुग्ण नाही. हे अत्यंत मोठे यश आहे. देशातील सोशल डिस्टन्सिंगचे बंधनही हटविले जाणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. संसर्ग सुरू होताच न्युझीलंड सरकारने 75 दिवसांची कठोर टाळेबंदी लागू केली होती. परंतु देशाच्या सीमा अद्याप खुल्या केल्या जाणार नाहीत.

फिलिपाईन्स : 579 रुग्ण

फिलिपाईन्सच्या आरोग्य विभागाने दिवसभरात 579 नवे रुग्ण सापडल्याची माहिती सोमवारी दिली आहे. देशातील बाधितांचा एकूण आकडा 22 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. मागील 24 तासांमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींची एकूण संख्या 1 हजार 11 झाली आहे. अन्य देशातून दाखल झालेल्या 32 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. देशात कठोर उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

भारतीय डॉक्टरचा मृत्यू

भारतीय डॉक्टर सुधीर रामभाऊ वाशिमकर यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 61 वर्षीय वाशिमकर अल ऐन शहराच्या रॉयल रुग्णालयात कार्यरत होते. रुग्णालयाने पत्रक प्रसिद्ध करत वाशिमकर यांच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. रुग्णांवर उपचार करताना वाशिमकर यांना संसर्ग झाला होता. 11 मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संयुक्त अरब अमिरातमध्ये मोठय़ा संख्येत भारतीय डॉक्टर्स कार्यरत आहेत.

ब्राझील : जनता नाराज

ब्राझीलमध्ये दिवसभरात 904 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील बळींचा एकूण आकडा 37,312 वर पोहोचला आहे. ब्राझीलमध्ये सरकारच्या विरोधात आता संताप वाढू लागला आहे. ब्राझील सरकारने 4 जूनंतर महामारीसंबंधी कुठलीच माहिती दिलेली नाही. सरकार देश आणि जगापासून माहिती लपवत असल्याचा आरोप होत आहे. प्रसारमाध्यमांनी याप्रकरणी सरकारवर कडाडून टीका केली आहे.

चीन : 6 नवे बाधित

चीनमध्ये सोमवारी 6 नवे बाधित आढळले असून हे सर्व जण विदेशातून दाखल झाले होते अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे 83,040 रुग्ण सापडले आहेत. यातील 65 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. 78 हजार 341 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 4 हजार 634 जणांना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे.

मेक्सिकोमध्ये 188 बळी

मेक्सिकोत मागील 24 तासांमध्ये कोरोना संसर्गामुळे 118 जणांचा मृत्यू ओढवला आहे. देशातील बळींचा एकूण आकडा आता 13 हजार 699 झाला आहे. दिवसभरात मेक्सिकोमध्ये 3,484 नवे बाधित सापडले आहेत. देशातील बाधितांचे एकूण प्रमाण आता 1 लाख 17 हजार 103 झाले आहे. तेथे सद्यकाळात 19 हजार 629 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मेक्सिकोतील संकट वाढत चालले आहे.

पाक : अर्थव्यवस्थेची काळजी

पाकिस्तानातील बाधितांची संख्या 1,03,671 वर पोहोचली आहे. तर 2067 जणांचा संसर्गामुळे मृत्यू ओढवला आहे. मागील 24 तासांत 4,960 नवे बाधित सापडले आहेत. रुग्ण वाढत असूनही पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा टाळेबंदी लागू करण्यास नकार दिला आहे. देशात गरिबांची संख्या प्रचंड असल्याने टाळेबंदी लागू केल्यास अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याचा दावा इम्रान यांनी केला आहे.

अमेरिका : रुग्ण वाढले

ट्रम्प प्रशासन दोन आघाडय़ांवर लढत आहे. देशातील बाधितांचा आकडा 20,07,531 वर पोहोचला आहे. कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर होत असलेल्या निदर्शनांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. निदर्शनांमध्ये मुखपट्टा परिधान केलेले लोक दिसून येत असले तरीही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होताना दिसून येत नाही.

Related Stories

स्पुतनिक 5 पासून एड्स होण्याचा धोका?

Patil_p

अमेरिकेवर भारताचे 16 लाख कोटींचे कर्ज

Patil_p

सुदानच्या पंतप्रधानांचा राजीनामा, देशात अस्थिरता

Patil_p

अमेरिकेकडून भारताला 5.9 मिलियन डॉलरची मदत

prashant_c

कोलंबसचा पुतळा प्रखर विरोधानंतर हटवला

Patil_p

तैवानमध्ये आगीत 46 जणांचा मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!