तरुण भारत

ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटूला कोरोनाची बाधा

वृत्तसंस्था/ टोकियो

जपानमध्ये सुरू असलेल्या जे लिग फुटबॉल स्पर्धेत सहभागी असलेल्या नागोया ग्रेम्पस क्लबचा ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटू मिचेल लँगेरॅक याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती या क्लबच्या वरि÷ अधिकाऱयांनी दिली आहे.

Advertisements

31 वषीय लँगेरॅक हा ऑस्ट्रेलियन गोलरक्षक जपानमधील लिग फुटबॉल स्पर्धेत खेळत आहे. 2017 साली लँगेरॅक याने जपानमधील साकेरूस क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या आठवडय़ात आणखी एक फुटबॉलपटू मु कानाझाकी याला कोरोनाची बाधा झाली होती. जपानमधील अनेक फुटबॉलपटूंची कोरोना चाचणी प्रक्रिया सुरू आहे. लँगेरॅकच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध चालू असल्याचे क्लबच्या प्रवक्त्याने सांगितले. या क्लबच्या प्रशिक्षकवर्गाची कोरोना चाचणी घेणे बाकी आहे.

कोरोना महामारी संकटामुळे जपानमधील सर्व फुटबॉल स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता जुलैच्या प्रारंभी देशातील व्यवसायिक फुटबॉलला पुन्हा सुरुवात केली जाणार आहे. मात्र, फुटबॉलचे सामने बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना खेळविले जातील. 2018 च्या डिसेंबरमध्ये लँगेरॅकने आपला शेवटचा सामना जपानमध्ये साकेरूस क्लबकडून खेळला होता आणि या मित्रत्वाच्या सामन्यात साकेरूसने ओमानचा 5-0 असा पराभव केला होता. जपानमधील जे लिगमधील कोरोनाबाधित झालेला लँगेरॅक हा दुसरा फुटबॉलपटू आहे.

Related Stories

यजमानपद शर्यतीतून माँट्रियलची माघार

Amit Kulkarni

कोरोनाविरुद्ध लढय़ासाठी बेट लीकडून बिटकॉईनची मदत

Patil_p

माजी नेमबाज व प्रशिक्षिका पूर्णिमा जनाने यांचे निधन

Patil_p

भारतीय संघ ऑगस्टमध्ये लंका दौऱयावर?

Patil_p

रोनाल्डोच्या आर्मबँडची 75000 डॉलर्सला विक्री

Patil_p

इंग्लंड क्रिकेट संघाला दंड

Patil_p
error: Content is protected !!