तरुण भारत

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला उद्यापासून सुरुवात

ऑनलाईन टीम / अयोध्या : 

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला उद्यापासून (दि.१०) सुरवात होणार आहे. उद्या सकाळी धार्मिक विधी उरकून बांधकामाची पहिली वीट ठेवण्यात येईल, असे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपाल दास यांचे प्रवक्ते महंत कमल नयन दास यांनी सांगितले. 

Advertisements

राम मंदिरासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचे सपाटीकरण आणि खोदकाम 11 मेपासून करण्यात आले. त्यानंतर आता मंदिराच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. रुद्राभिषेक आणि विशेष प्रार्थनेने बांधकामाची पहिली वीट ठेवण्यात येईल. सकाळी 8 वाजता या धार्मिक विधींना सुरवात होईल. पुढे 2 तास हे विधी चालतील. त्यानंतर पायभरणीच्या कामाचा शुभारंभ होईल.

मागील महिन्यात राम लल्लांची मूर्ती तात्पुरत्या मंदिराच्या ठिकाणाहून नवीन ठिकाणी हलविण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी मंदिराच्या जागेचे सपाटीकरण करताना पुरातन काळातील देवदेवतांच्या मुर्ती, नक्षीदार खांब, पुष्प कलश, शिवलिंग यासारख्या ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत. 

Related Stories

माणशी पन्नास किलो अन्नधान्य जातंय वाया…

Patil_p

‘पतंजली’कडून नवे कोरोना औषध सादर

Patil_p

पुण्यातील शाळा 30 जानेवारीपर्यंत राहणार बंद

Sumit Tambekar

जगभरात 15 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

मुंबईत घरोघरी जाऊन सध्या तरी कोरोना लस नाही : किशोरी पेडणेकर

Abhijeet Shinde

नितीशकुमार आज शपथबद्ध होणार

Patil_p
error: Content is protected !!