तरुण भारत

जिल्ह्यातील १२ नागरिकांना डिस्चार्ज

७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात संशयित म्हणून नमुना पाठविला तपासणीला तर १३१ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

काल बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथील आठ व श्रीमती सुशिला देवी साळुंखे गर्ल्स हॉस्टेल, पाटण येथील चार असे एकूण बारा जणांना रुग्णालयातून दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या खंडाळा तालुक्यातील भादवडे येथील ७२ वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून संशयित म्हणून नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

काल उशिरा डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये पाटण तालुक्यातीलजांभेकरवाडी येथील ४९ वर्षीय पुरुष व १८ वर्षीय युवक, नवारस्ता येथील ४६ वर्षीय महिला व घनबी येथील ६२ वर्षीय महिला.वाई तालुक्यातील किरोंडे येथील २५ वर्षीय पुरुष, आसले येथील 26 वर्षीय महिला व ३ वर्ष ५ महिन्याची बालीका, कोंडावले येथील ४७ वर्षीय पुरुष, धर्मापुरी येथील २३ वर्षीय पुरुष, जांभळी येथील ३२ व ३१ वर्षीय पुरुष व २५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे रात्री उशिरा खंडाळा तालुक्यातील भादवडे या गावातील ७२ वर्षीय पुरुषाचा सारी या आजाराच्या उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कोविड संशियत म्हणून त्यांचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या रुग्णाला चार वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता त्यावर ते उपचार घेत होते.

काल रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांनी १३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

Related Stories

मित्राला वाचवताना युवकाचा बुडून मृत्यू

Patil_p

‘कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करा’

Rohan_P

सातारा : वाढत्या आकडयाने भरतेय धडकी

Abhijeet Shinde

एप्रिलसह महापूर काळातील धान्य शिल्लक कसे ?-शिवसेना

Abhijeet Shinde

बाहेरून येणाऱयांची गावाबाहेर कुटुंबियांनी सोय करावी

Patil_p

डॉ जे जे मगदूम शैक्षणिक संकुलात बी फार्मसी महाविद्यालयास मान्यता- विजय मगदूम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!