तरुण भारत

… म्हणून संतापलेल्या किम जोंग उन यांनी तोडले दक्षिण कोरियाशी संबंध

ऑनलाईन टीम / प्योंगयांग :

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी शत्रू राष्ट्र असलेल्या दक्षिण कोरियाशी सैन्य करार आणि राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून या दोन्ही देशांदरम्यानच्या संपर्क लाईन आणि राष्ट्रपती कार्यालयातील हॉट लाईन बंद करण्यात येणार आहेत. 

Advertisements

उत्तर कोरियामधील काही बंडखोर दक्षिण कोरियामधून काही फुगे सोडतात. तसेच दक्षिण कोरियाच्या सीमेवर पत्रके वाटतात. त्यामध्ये किम जोंग उन यांच्या हुकुमशाहीविरोधात काही संदेशही लिहिलेले असतात. अशा प्रकारची बदनामीकारक पत्रके वाटणाऱ्या लोकांना दक्षिण कोरियाने रोखणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे संतापलेल्या किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाशी आलेले सर्व संबंध संपुष्टात आणण्याचा मोठा निर्णय घेतला.

दक्षिण कोरियातून फुगे उडवणाऱ्यांना थांबवण्यासाठी उत्तर कोरियाने अनेकदा पोलिसांद्वारे कारवाई केली होती. पण यावर बंदीची उत्तर कोरियाची मागणी मात्र फेटाळण्यात आली होती. त्यामुळे किम जोंग उन यांच्या बहिणीने यापूर्वीच दक्षिण कोरियाला सैन्य करार आणि इतर संबंध संपुष्टात आणण्याचा इशारा दिला होता.

Related Stories

सौदी अरेबियात कोरोनामुळे 11 भारतीयांचा मृत्यू

prashant_c

‘मृत्यूच्या गुहे’त 6 हजार वर्षांपूर्वींचा सांगाडा

Patil_p

फ्रान्स : पोलीस ठाण्यातच चिरला महिला अधिकाऱ्याचा गळा

datta jadhav

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कारवर दगडफेक

Rohan_P

जो बायडेन, कमला हॅरिस टाईम ‘पर्सन ऑफ द ईयर’

Patil_p

भाजपचे आंदोलन म्हणजे… सौ चुहे खाके बिल्ली हज को चली असा प्रकार : जयंत पाटील

Rohan_P
error: Content is protected !!