मुंबई
कोरोना व्हायरसचा असर सर्वत्र दिसत असला तरी ऍमेझोनचे सर्वेसर्वा जेफ बेजोस यांच्या संपत्तीत मात्र वाढ झालेली दिसते आहे. त्यांची संपत्ती 35 अब्ज डॉलरने वाढून 150 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. या वर्षात ही वाढ संपत्ती मुल्यात दिसलीय. ऍमेझोनच्या शेअरबाजारातील समभाग वाढीचे कारण यामागे सांगितले जात आहे. मार्चमध्ये कोरोनाचा कहर सुरु झाला आणि एकाकी ऍमेझोनच्या मागणीने वेग घेतला. कंपनीने रिटेल क्षेत्रात मागणीचा कल लक्षात घेत 1 लाख 75 हजार जणांना भरती करून घेतलं. जेणेकरून मागणी पुरवठय़ात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही, याची काळजी कंपनीने पुरेपूर घेतली. कंपनीच्या शेअरबाजारातील समभागाचे दर 2 हजारच्यावर पोहचले होते. मार्च 18 नंतरच्या 11 आठवडय़ात बेजोस यांच्या संपत्तीमूल्यात 36.2 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे.