तरुण भारत

राज्यसभेसाठी ईराण्णा कडाडी यांचा अर्ज दाखल

प्रतिनिधी/ बेळगाव

राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आणि राज्यसभेसाठी अनेकांची चुरस निर्माण झाली. मात्र भाजपने साऱयांनाच धक्का देत राज्य सभेची उमेदवारी ईराण्णा कडाडी यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी मंगळवारी बेंगळूर येथे अर्ज दाखल केला. विधानसभेचे सचिव एम. के. विशालाक्षी यांच्याकडे अर्ज दिला आहे.

राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून प्रभाकर कोरे आणि आमदार उमेश कत्ती यांचे बंधू रमेश कत्ती यांच्या उमेदवारीबाबत जिह्यामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली. प्रभाकर कोरे यांनी बेंगळूरला धाव घेतली तर कत्ती बंधूंनी उत्तर कर्नाटकातील आमदारांची मोट बांधत पक्षावर दबाव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या हायकमांडने या सर्वांनाच डावलून एक नि÷ावंत कार्यकर्ते असलेल्या ईराण्णा कडाडी यांना उमेदवारी जाहीर केली. याचबरोबर आणखी एका जागेसाठी अशोक गस्ती यांनाही उमेदवारी दिली.

राज्यसभेसाठी 19 जून रोजी मतदान होणार आहे. चार जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस 9 जून आहे. त्यामुळे ईराण्णा कडाडी यांनी पक्षाच्या आदेशानुसार हा अर्ज दाखल केला आहे. मात्र इतर जागा बिनविरोध होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. याचे चित्र आता उद्याच स्पष्ट होणार असे दिसत आहे. 

Related Stories

नियोजनाला कष्टाची जोड, दर्जेदार पिकांची लाभली साथ

Omkar B

तिगडी ग्रा.पं.अध्यक्षाचा भीषण खून

sachin_m

कुटुंबियांनी घेतली विनय कुलकर्णी यांची भेट

Patil_p

शहरात 25 मेगावॅटने विजेची मागणी वाढली

Patil_p

कलाच आत्मिक समाधान देवू शकते!

Omkar B

रस्त्यात नोटा फेकण्याचे प्रकार सुरूच

Patil_p
error: Content is protected !!