तरुण भारत

रशियात आतापर्यंत 6 हजार बळी

जगभरात 72,19,187 कोरोनाबाधित : 4,09,108 जणांना गमवावा लागला जीव : डब्ल्यूएचओचा सतर्कतेचा इशारा

जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 4, 09,108 जणांचा मृत्यू ओढवला आहे. तर बाधितांचा एकूण आकडा 72 लाख 19 हजार 186 वर पोहोचला आहे. जगात आतापर्यंत 35,54,834 बाधितांनी कोरोना संसर्गावर मात करण्यास यश मिळविले आहे. रशियात कोरोना संसर्गाच्या बळींचा आकडा वाढत चालला आहे. मागील 24 तासांमध्ये रशियात 171 जण दगावल्याने एकूण संख्या 6,142 झाली आहे. महामारीचा प्रभाव दरवर्षी होणाऱया पुरस्कार सोहळय़ांवर पडू लागला आहे. आशियाचा नोबेल म्हटल्या जाणाऱया रॅमन मेग्सेसे पुरस्कार यंदा वितरित केले जाणार नाहीत.

Advertisements

चीन-ऑस्ट्रेलियात तणाव

चीनच्या शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी एक विधान प्रसिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी जाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी पुनर्विचार करावा. ऑस्ट्रेलियात वंशद्वेषाच्या घटना वाढत असल्याचे म्हणत चीनने आशियाई नागरिकांसोबत होत असलेल्या कथित प्रकारांचा उल्लेख केला आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रवास टाळण्याचा सल्ला चीनने मागील आठवडय़ात स्वतःच्या नागरिकांना दिला होता. ऑस्ट्रेलियाने कोरोनासाठी चीनला जबाबदार धरल्याने त्यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे.

दिवसात 171 बळी

रशियात कोरोना महामारीमुळे दिवसभरात 171 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8,595 नवे बाधित सापडले आहेत. देशातील बाधितांचा एकूण आकडा 4,85,253 वर पोहोचला आहे. राजधानी मॉस्को समवेत अनेक भागांमध्ये कठोर निर्बंध लागू असले तरीही पूर्वीच्या तुलनेत ते शिथिलच आहेत. रशियातील सरकार आणखी एक तात्पुरते रुग्णालय उभारण्याची तयारी करत आहे. मॉस्को शहरामध्ये यापूर्वीच अशाप्रकारच्या रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ब्राझील : नवी आकडेवारी

देश आणि जगातून होत असलेल्या टीकेनंतर ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने अखेरीस 5 दिवसांनी संसर्गाची नवी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. दिवसभरात 15 हजार 654 नवे रुग्ण सापडल्याचे सांगण्यात आले आहे. तर देशात 7,10,887 बाधित आहेत. 24 तासांमध्ये 679 जणांचा बळी गेला आहे. देशातील बळींचा आकडा आता 37,312 झाला आहे. 4 जूननंतर ब्राझीलने खरी आकडेवारी दिली नसल्याचा आरोप प्रसारमाध्यमांनी केला होता.

इस्रायल : निर्बंध घटणार

इस्रायलमध्ये संसर्गाची दुसरी लाट दिसून येत आहे. रुग्ण वाढत असले तरीही सरकार निर्बंध शिथिल करण्याचा विचार करत आहे. परंतु सोमवारपासून सुरू होणारी रेल्वेसेवा अखेरच्या क्षणी स्थगित करण्यात आली आहे. देशात काही नियमांसह प्रवास करता येणार आहे. चित्रपटगृहे 14 जूनपासून सुरू होणार आहेत. तर विवाहसोहळय़ांमध्ये 250 जणांना सहभागी होता येणार असून त्या सर्वांची नोंद ठेवावी लागणार आहे. इस्रायलमध्ये आतापर्यंत 18 हजार 32 बाधित सापडले आहेत.

प्रचार करणार ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महामारीदरम्यान 2020 च्या निवडणूक प्रचाराची तयारी सुरू केली आहे. ट्रम्प चालू महिन्यातच प्रचारसभा घेणार आहेत. मिनेसोटामध्ये कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर ट्रम्प प्रशासनाला होणारा विरोध वाढला आहे. आगामी निवडणुकीत ट्रम्प यांना डेमापेट उमेदवार ज्यो बिडेन यांचा सामना करावा लागणार आहे.

डॉक्टरांचा आरोप

निकारागुआ सरकारच्या आकडेवारीपेक्षा 5 पट अधिक रुग्ण देशात असल्याचा आरोप तेथील डॉक्टरांनी केला आहे. सिटिजन्स इंडिपेंडेंट नेटवर्क नावाची संघटना बाधितांच्या संख्येवर लक्ष ठेवून आहे. सरकारने आतापर्यंत एकूण 1,118 रुग्ण आणि 46 बळींची माहिती दिली आहे. तर देशात 5 हजार 27 रुग्ण असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

क्यूबा : बळींवर नियंत्रण

क्यूबामध्ये 9 दिवसांपासून एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. 24 तासांमध्ये 9 नवे बाधित सापडल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. क्यूबातील विमानसेवा बंद असून संशयित रुग्ण केवळ शासकीय रुग्णालयात उपचार करवून घेऊ शकतात. देशात मुखपट्टा वापरणे सक्तीचे आहे. क्यूबात आतापर्यंत 2,200 रुग्ण सापडले असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. 

मॅग्सेसे सोहळा नाही

फिलिपाईन्सच्या मनीला येथे आयोजित होणारा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला आहे. 60 वर्षांच्या कालखंडात पुरस्कार वितरण न करण्याची ही तिसरी वेळ असणार आहे. 1970 मध्ये आर्थिक संकटामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला होता. तर 1990 मध्ये फिलीपाईन्समध्ये भूकंप झाल्याने पुरस्काराचे वितरण करण्यात आले नव्हते.

Related Stories

ऑर्डर घेतल्यावर विसरतात वेटर

Patil_p

भारताच्या मदतीसंबंधी अमेरिकेची कृतज्ञता

Patil_p

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ‘सेल्फ आयसोलेट’

Patil_p

आता ‘दृष्टीहीन’ही पाहू शकणार

Patil_p

अफगाणींचे भवितव्य अंधकारमय

Patil_p

‘युएन’मध्ये पाकिस्तानला सुनावले खडे बोल

Amit Kulkarni
error: Content is protected !!