तरुण भारत

ज्योतिरादित्य सिंदिया कोरोना पॉझिटिव्ह

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजपचे नेते ज्योतिरादित्य सिंदिया व त्यांच्या आई माधवी राजे सिंदिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांवर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या पत्नी प्रियदर्शनी, मुलगा महाआर्यमन आणि मुलगी अनन्या राजे याची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती मंगळवारी सूत्रांनी दिली.

Advertisements

माधवी राजे सिंदिया यांची दोन जूनपासूनच प्रकृती बिघडली होती. त्यांना दिल्लीतील मॅक्स सुपर स्पेशॉलिटी रुग्णालयात दाखल केले. यानंतर ज्योतिरादित्य सिंदिया यांनाही घसादुखी व डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. दोघांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याची माहिती मिळताच भाजपसह काँगेसमधील नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी भावना व्यक्त केली आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर गुरूग्राम परिसरातील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

कोरोना : दिल्लीत दिवसभरात 8,798 नवे बाधित; 39 मृत्यू

Rohan_P

‘निवडणूक रोखे’ स्थगितीस नकार

Patil_p

उत्तराखंडातील कोरोना कर्फ्यूमध्ये 9 जूनपर्यंत वाढ!

Rohan_P

भाजपच्या आंदोलनावेळी प. बंगालमध्ये तणाव

Patil_p

हाफिजची पाककडून पाठराखण

Patil_p

पंतप्रधान मोदी २४ ऑक्टोबर रोजी देशवासियांशी साधणार ‘मन की बात’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!