तरुण भारत

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यजमानपदासाठी अमेरिका उत्सुक

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

2023 नंतर होणाऱया आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यासाठी क्रिकेट अमेरिकेने उत्सुकता दाखविली आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजबरोबरच आता अमेरिकन क्रिकेट संघटनेने आयसीसीची क्रिकेट स्पर्धा भरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 1994 ची फिफाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा अमेरिकेने मोठय़ा प्रमाणात यशस्वी केली आहे. आता अमेरिकन क्रिकेट संघटना आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरविण्यासाठी सज्ज झाली आहे.

Advertisements

आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अमेरिकेला भरविण्याची संधी मिळाली तर अमेरिकेतील प्रत्येक क्रिकेट केंद्र या स्पर्धेसाठी विकले जाईल, अशी आशा अमेरिकन क्रिकेट संघटनेचे प्रमुख कार्यकारी हिगेन्स यांनी बीबीसीच्या क्रीडा वाहिनीशी बोलताना सांगितले. 1994 ची फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा अमेरिकेने मोठय़ा प्रमाणात यशस्वी केली होती. या स्पर्धेला विक्रमी 3.5 लाख लोकांची उपस्थिती दर्शविली होती आणि हा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विक्रम आहे, असेही त्यांनी सांगितले. अमेरिकन देशाला क्रिकेट नवखे असले तरी आयसीसीची क्रिकेट स्पर्धा भरविताना अमेरिका क्रिकेट क्षेत्राच्या यजमानपद इतिहासात आघाडीवर राहिल, असा विश्वास हिगेन्स यांनी व्यक्त केला. आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद अमेरिकेला मिळावे यासाठी अमेरिकन क्रिकेट संघटनेतर्फे आयसीसीचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी आयसीसीकडून अमेरिकन क्रिकेट संघाला वनडे क्रिकेटचा दर्जा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी दशकामध्ये अमेरिकन क्रिकेट संघ कसोटी दर्जा आयसीसीकडून निश्चितच मिळवेल आणि आगामी 10 वर्षांच्या कालावधीत अमेरिका हा आयसीसीचा पूर्ण सदस्य झाल्याचे पहावयास मिळेल, असे हिगेन्स यांनी सांगितले.

Related Stories

इटलीत विजयोत्सव करताना अनेक जखमी, एकाचा मृत्यू

Patil_p

विंडीजचा क्रिकेटपटू मिंडले कोरोना बाधित

Patil_p

पाकिस्तान-बांगलादेश पहिली कसोटी आजपासून

Amit Kulkarni

सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत गारद

Patil_p

जागतिक अजिंक्यपदासाठी कार्लसन-नेपोम्नियाची लढत आजपासून

Amit Kulkarni

टिमीया-क्रिस्टिना, केविन-आंद्रेयास दुहेरीत अजिंक्य

Patil_p
error: Content is protected !!