तरुण भारत

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत ठाकुर पिता-पुत्राचे विजय

वृत्तसंस्था/ नागपूर

पहिल्यांदाच ऑनलाईनवर आयोजित करण्यात आलेल्या हेरसनसीसोस आंतरराष्ट्रीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱया फेरीत आकाश ठाकुर आणि त्यांचे पुत्र अरित ठाकुर यांनी आपले शानदार विजय नोंदविले.

Advertisements

या स्पर्धेतील पहिल्या दोन दिवसांमध्ये ठाकुर पिता-पुत्रांना समिश्र यश मिळाले होते. पण तिसऱया फेरीत त्यांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवित वाटचाल केली आहे. सदर स्पर्धा ग्रीक बुद्धिबळ फेडरेशनतर्फे ऑनलाईनवर आयोजित केली असून एकूण 9 फेऱयांची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत 52 बुद्धिबळपटूंनी आपला सहभाग दर्शविला आहे. आठवा सिडेड आणि फिडेमास्टर आकाश ठाकुरने तिसऱया फेरीतील सामन्यात मोहमद बशिकचा 47 व्या चालीत पराभव केला. तर दुसऱया एका सामन्यात अरित ठाकुरने अझरबेझानच्या इमिन सेराफवर 26 व्या चालीत मात केली.

Related Stories

जीवघेण्या अपघातानंतरही रोमेन ग्रोस्जेन सुरक्षित

Patil_p

रशियाचा आंद्रे रूबलेव्ह अजिंक्य

Patil_p

सौदीतील पहिली महिला गोल्फ स्पर्धा ऑक्टोबरमध्ये

Patil_p

भारतीय प्रशिक्षकासाठी ऑनलाईन सराव शिबीर

Patil_p

विंडीजविरुद्ध श्रीलंका 218 धावांनी आघाडीवर

Patil_p

मानस स्पोर्ट्स संघाकडे फॅन्को चषक

Omkar B
error: Content is protected !!