तरुण भारत

पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2734 वर 

ऑनलाईन टीम / चंदीगड : 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मंगळवारी एका दिवसात 71 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये फरिदकोट येथील एकाच कुटुंबातील 13 जण आणि फतेहगढ साहिब मधील 2 रुग्णांचा देखील समावेश आहे. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकुण संख्या 2734 झाली आहे. 

Advertisements


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आता पर्यंत 1 लाख 36 हजार 343 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहे. राज्यातील विविध रुग्णालयात 497 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आता पर्यंत कोरोनामुळे 55 जणांनी आपला जीव गमावला आहे. 


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे कालच्या एका दिवसात 39 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत एकूण 2167 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

Related Stories

केरळमध्ये रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ

Patil_p

तेलंगणात 3600 मुलांची मुक्तता

Patil_p

मुंबईत घराबाहेर पडताना मास्क न वापरल्यास होणार अटक

prashant_c

दिल्ली : शेतकऱ्यांचे आज ‘चक्का जाम’ आंदोलन

datta jadhav

देशात कोरोना संसर्ग चिंताजनक पातळीवर

Amit Kulkarni

‘धन्वंतरी रथा’मुळे कोरोनाला खीळ

Patil_p
error: Content is protected !!