तरुण भारत

सरकारने गृह कर्ज योजना रद्द करत सरकारी कर्मचाऱयांवर अन्याय केला

मोहनदास लोलयेकर यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी / पणजी

सरकारी कर्मचाऱयांसाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राबवलेली दोन टक्के व्याजदराने गृह कर्ज योजना सध्याच्या सरकारने रद्द करण्याबाबत परीपत्रक जारी करुन सरकारी कर्मचाऱयांवर अन्याय केला आहे. असा आरोप गोवा फाँरवर्ड पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी केले.

मंगळवारी आयोजित पत्रकार परीषदेत मोहनदास लोलयेकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत दिलीप प्रभुदेसाई उपस्थित होते.

ही सरकारी कर्मचाऱयांसाठी गृह खरेदी कर्ज योजना 1988 सालापासून सुरु होती. परंतु सध्या कोरोनाचे निमित्त करुन सरकार ही योजना रद्द करत आहे. तसेच या योजने रद्द करण्यासोबत या योजनेअंतर्गत घर घेतलेल्या सरकारी कर्मचाऱयांना आता बाजारभावाने व्याजदर देण्याची सक्ती करण्यात आली आहे. हे अत्यंत चूकिचे आहे. असे लोलयेकर यांनी पुढे सांगितले.

राज्य सरकारने सध्या कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडली असल्याचे कारण सांगितले असले तरी ही योजना रद्द करण्याबाबतचे परीपत्रक सरकारने दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी बँकेला पाठविले होते आणि लॉकडाऊन मार्चमध्ये झाले होते.  सरकारी कर्मचाऱयांना त्रास न करता सरकारने ही योजना पुन्हा लागू करावी अशी मागणी लोलयेकर यांनी केले.

 सरकारची आर्थिक स्थिती खरीच बिघडली आहे तर त्यांना आपल्या मंत्र्यांच्या खर्चात कपात करावी. प्रत्येक मंत्री चार-चार वाहने घेऊन फिरत आहे. जर परीस्थिती खरीच बिघडली असती तर असे झाले नसते. सरकारची आर्थिक स्थिती बिघडलेली नसून ते फक्त दिखावा करत आहे. असा आरोपही मोहनदास लोलयेकर यांनी केला.

Related Stories

माटोळी बाजार भरण्याचे काणकावासीयांकडून स्वागत

Patil_p

ओकांब धारबांदोडा येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Patil_p

झवेरीच्या रेव्ह पार्टी सहभागाची न्यायालयीन चौकशी करावी

Omkar B

म्हादईप्रश्नी आपचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन

Amit Kulkarni

म्हापशातून एकूण 35 अर्ज दाखल

Amit Kulkarni

तळावली येथे स्कूटरवर झाड कोसळले

Omkar B
error: Content is protected !!