तरुण भारत

अफवेने पाकिस्तानची उडाली झोप, अन् झेपावली विमाने

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

काही अज्ञात लढाऊ विमाने कराचीजवळ आकाशात घिरट्या घालत असल्याची अफवा मंगळवारी रात्री पाकिस्तानी सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानची लढाऊ विमाने हवेत झेपावली. मात्र, या अफवेने पाकिस्तानने संपूर्ण कराची शहराची लाईट रात्रभर बंद ठेवली.

Advertisements

कराचीजवळ लढाऊ विमाने घिरट्या घालत असल्याचा व्हिडीओ कराचीच्या लोकांनीच सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओची खातरजमा न करता पाक हवाई दलाची लढाऊ विमानेही लगेच हवेत झेपावली. त्यामुळे पाकिस्तानात घबराटीचे वातावरण पसरले. त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण कराची रात्रभर अंधारात ठेवण्यात आली. सोशल मीडियावरील या अफवेने पाकिस्तानची झोप उडवली.

मागील महिनाभरापासून पीओके, गिलगिट, बाल्टिस्तानवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. त्यातच पाकिस्तानने गिलगिट, बाल्टिस्तान निवडणूक घेण्याचे ठरवले होते. त्यावरून भारताने पाकिस्तानला हा भाग खाली करण्यास सांगितले होते. कराचीतील काळीबाणी आणि वाढल्या भीतीमुळे अनेकांनी ट्विटरवरुन भारत मागील वर्षीच्या एएएफने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याची पुनरावृत्ती करत असल्याची अफवा पसरवली होती.

Related Stories

हरियाणा : शालेय शिक्षणात होणार आता योगाचा समावेश

pradnya p

एकही मृत्यू नाही

Patil_p

पश्चिम बंगालमधील गरीब जनतेला जून 2021 पर्यंत देणार मोफत धान्य : ममता बॅनर्जी

pradnya p

डिजिटल मतदार ओळखपत्र आजपासून मिळणार

Patil_p

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना सशर्त जामीन मंजूर

pradnya p

इंडिगो विमानाचे कराचीत आपत्कालीन लँडिंग; तरीही वाचला नाही प्रवाशाचा जीव

datta jadhav
error: Content is protected !!