तरुण भारत

कुंडल मध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

कुंडल / वार्ताहर

कुंडल येथे 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कुंडल परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुंडल (ता. पलूस) येथील मुंबईवरून आलेल्या कुटुंबास होमकोरंटाईन करण्यात आले होते. त्यातील 55 वर्षीय पुरूषामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत मात्र 55 वर्षाच्या पुढील असल्याने दिनांक 9 जुन रोजी तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा तपासणी अहवाल दिनांक 10 जुन रोजी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीस उपचारासाठी मिरज येथील शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. तसेच हा परिसर निर्जतूकीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या संबंधातील इतर 16 जणांचे स्वॅब घेवून त्यांना पलूस येथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असल्याची माहीती तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी दिली. यावेळी गटविकास अधिकारी राहूल रोकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी किरण भोरे, सरपंच प्रमिला पुजारी, उपसरपंच माणिक पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता माने, ग्रामविकास अधिकारी एस. ए. कुलकर्णी यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कुंडल परिसरातील नागरिकांनी भीती न बाळगता मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सचा वापर करावा. तसेच या व्यक्ती अथवा कुटुंबांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी वैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार यांनी केले आहे.दरम्यान सुरक्षितता म्हणून गावातील सर्व व्यवहार चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत, व्यापारी संघटना व प्रशासनाने घेतला आहे.

Advertisements

Related Stories

सांगली : आटपाडी तहसीलदार,कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Abhijeet Shinde

आत्महत्येला परवानगी द्या, शेकडो मानसेवी डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Abhijeet Shinde

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा

Rohan_P

सांगली : कुपवाड घरफोडी प्रकरणी चोरट्यास अटक, ७६ हजाराचे दागिने हस्तगत

Abhijeet Shinde

75 टक्के मुक्ती गाठलेल्या सातारा जिल्ह्यात नव्याने 21 बाधित

Abhijeet Shinde

त्याला जीवदानही मिळाले अन घर देखील

Patil_p
error: Content is protected !!