तरुण भारत

गुगल मॅपमध्ये लवकरच अमिताभ बच्चन यांचा आवाज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सध्याच्या कालावधीत प्रवासाच्या दरम्यान वाहन चालवताना महत्वाचा वाटा सांभाळत असणारे गुगल मॅप हे जवळपास सर्वांच्या परिचयाचे झालेले आहे. यामध्ये आपण रस्ता चुकल्यास किंवा कोणत्याही अनोळखी ठिकाणी मार्गदर्शन करण्याचे काम त्या ऍपमधील एका महिलेचा आवाज करीत असतो. परंतु आता हाच आवाज त्या महिलेऐवजी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आगामी काळात कानावर पडणार असल्याचे संकेत आहेत. बच्चन यांच्या आवाजाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समजते. चालू स्थितीत गुगल मॅप नेव्हिगेशनमध्ये न्यूयॉर्कच्या कॅरन जेकब्सन यांचा आवाज ऐकण्यास मिळतो आहे. 

Advertisements

एका अहवालानुसार गुगलने अमिताभ बच्चन यांचा आवाज मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत याबाबत चर्चा सुरु आहे.

असल्याचे समजते. कारण बच्चन यांचा आवाज हा जगातील सर्वाधिक पसंती दर्शवणाऱया आवाजापैकी एक असल्याचे मानले जात आहे. परंतु यासंदर्भात अमिताभ बच्चन आणि गुगल यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण मात्र देण्यात आलेले नाही.

Related Stories

जागतिक टीव्ही बाजारात सॅमसंगचा दबदबा

Amit Kulkarni

अगरबत्ती आयातीवर निर्बंध लादणार

Amit Kulkarni

सेन्सेक्स-निफ्टी नव्या उच्चांकावर स्थिरावले

Amit Kulkarni

स्टरलाईट पॉवर व ईएसडीएस यांना सेबीची मंजुरी

Patil_p

मोबाईल टॉवर उभारण्याच्या नियमात शिथिलता

Patil_p

रॅपिडोची रेंटल बाईक सर्व्हिस सेवा 6

Patil_p
error: Content is protected !!