तरुण भारत

जन्मदिनीच आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू

द्रमुक आमदार अंबाजगन कालवश : मूत्रपिंडाचा होता आजार

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisements

तामिळनाडूतील द्रमुक आमदाराचा कोविड-19 संसर्गामुळे बुधवारी मृत्यू झाला आहे. द्रमुक आमदार जे. अंबाजगन यांचा बुधवारी वाढदिवस होता. जन्मदिनी झालेल्या त्यांच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ट्विटरवर अनेक राजकीय नेत्यांनी अंबाजगन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अंबाजगन 2 जूनपासून रुग्णालयात दाखल होते. द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी अंबाजगन यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अंबाजगन हे कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेले देशातील पहिले आमदार असल्याचे उद्गार काँग्रेस नेते शशी थरूर यांनी काढले आहेत.

अंबाजगन यांचा बुधवारी 62 वा जन्मदिन होता. दरवर्षी या दिनी अंबाजगन यांच्या दीर्घायुष्यासाठी लोक त्यांना शुभेच्छा द्यायचे. परंतु आज त्याऐवजी श्रद्धांजली वाहावी लागत असल्याची टिप्पणी समाजमाध्यमांवर करण्यात आली आहे.

कोविड-19 मुळे अंबाजगन यांना निमोनिया झाला होता. गंभीर असलेली त्यांची प्रकृती बुधवारी पहाटे वेगाने बिघडली आणि यातच त्यांचा मृत्यू ओढवल्याचे डॉ. रेला इन्स्टीटय़ूट अँड मेडिकल सेंटरने म्हटले आहे.

स्टॅलिन यांची भावुक टिप्पणी

अंबाजगन यांना भाऊ संबोधत द्रमुक अध्यक्ष स्टॅलिन यांनी ते नेहमीच लोकांच्या सेवेसाठी समर्पित होते, असे उद्गार काढले आहेत. लोकांसाठी अंबाजगन हे एक पेटती मशाल होते. कोरोना संकटादरम्यान अंबाजगन यांनी प्रचंड मेहनत केली. विशेषकरून महामारीच्या काळातही लोकांपर्यंत द्रमुकचे विचार त्यांनी पोहोचविले. दुर्दैवाने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची टिप्पणी स्टॅलिन यांनी केली आहे. अंबाजगन यांच्या निधनामुळे द्रमुकने सर्व निर्धारित कार्यक्रम स्थगित केले आहेत. अंबाजगन यांना मूत्रपिंडाशी संबंधित गंभीर आजार होता.

Related Stories

केरळमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 25 टक्के कपात

Patil_p

पहिल्यांदाच परराज्यातील व्यक्तीला मिळाले जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व

datta jadhav

डोळे बंद करून नेत्याचा प्रचार

Patil_p

परमबीर सिंग यांची सुप्रिम कोर्टात धाव

Patil_p

हरियाणाकडून दिल्ली सीमारेषा खुली

Patil_p

मुस्लीम लीगचा बालेकिल्ला, कम्युनिस्ट हार्ट लँड

Amit Kulkarni
error: Content is protected !!