तरुण भारत

मुंबईवरुन आलेल्या माथाडी कामगाराची आत्महत्या

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

कुरोशी (ता. महाबळेश्वर) येथे मंगळवारी मुंबईवरून पत्नी समवेत आलेल्या एका 55 वर्षीय इसमाने राहत्या घरापासुन जवळच असलेल्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली. हा इसम कोविड संशयित असल्याचे गृहित धरून त्याच्यावर येथील स्मशानभूमीत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारापुर्वी त्याच्या स्वॅबचा नमुना घेवुन तो तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

  मालाड, मुंबई येथील एक माथाडी कामगार मंगळवारी रात्री उशिरा आपल्या पत्नी समवेत कुरोशी गावी आला होता. गावात त्याच्या बंधुचे छोटे हॉटेल आह.s याच ठिकाणी दोघांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. पहाटे पत्नी झोपेत असतानाच ते उठुन बाहेर पडले. पत्नीने सकाळी उठल्यानंतर पाहिले तर पती बाहेर गेले होते. थोडय़ाच वेळात झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत ते आढळुन आले. या घटनेची खबर मेढा पोलीस ठाण्यास कळविण्यात आली असता पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. 

  ही व्यक्ती मुंबईवरून आली होती म्हणुन ती कोविड संशयित असल्याचे प्रशासनाने गृहीत धरले होते. पुढील सर्व योग्य ती खबरदारी घेवुन त्या इसमाचे शव हे महाबळेश्वर येथे आणण्यात आले. याच ठिकाणी त्याच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर त्या इसमाचा अंत्यसंस्कार त्याच्या पत्नी व इतर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत व पालिकेच्या मुख्यलिपिक आबा ढोबळे, बबन जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या कर्मचाऱयांनी केले. यावेळी ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राजीव शहा, डॉ. आदर्श नायर हे ही उपस्थित होते.

Related Stories

तासगाव कारखाना पूर्ण क्षमतेने चालविणार : खा. संजय काका पाटील

Shankar_P

जि.प. सीईओंची तडकाफडकी बदली

Patil_p

सातारा जिह्यास बर्ड फ्ल्युचा अद्याप धोका नाही

Patil_p

मराठय़ांचा अंत पाहू नका, उद्रेक होईल

Amit Kulkarni

राजवाडा बसस्थानक ते मंगळवार तळे बेशिस्त

Patil_p

कॉलेज-शाळांना दिवाळीत फक्त पाच दिवस सुट्टी

Patil_p
error: Content is protected !!