तरुण भारत

कोरोना संशयिताच्या घराचे निर्जंतुकीकरण

पेडणे  / प्रतिनिधी

पालये येथील कोरोना  संशयिताच्या घराचे व परिसराचे अग्निशमन दलाकडून निर्जंतुकीकरण करण्यात आले.  कदंबा महामंडळात मडगाव डेपोत कंडक्टर म्हणून कामाला असलेला पालये येथील एक कर्मचारी  हा कोरोना बाधित असल्याची चर्चा पेडणे तालुक्मयात सर्वत्र संध्याकाळी पसरल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. पालये परिसरातील दुकानेही बुधवारी बंद ठेवण्यात आली होती. 

Advertisements

   मांगोरहिलच्या वस्तीपुरताच राहिलेल्या कोरोना आता वास्को शहर सोडून इतर भागातही पसरु लागल्यामुळे सर्वत्र आता भीतीयुक्त वातावरण पसरले आहे.

 मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी या प्रकरणाची दखल घेत पेडणे आग्निशमन कार्यालयाला संपर्क साधून संशयिताच्या घराचे व तेथील परिसराचे सॅनिटायझर करण्याच्या सूचना केल्या. बुधवारी पेडणे अग्निशमन लाचे अधिकारी दिलीप गावस  तसेच विष्णूदत्त परब ,मनोज साळगावकर व प्रशांत साळगावकर यांनी त्या कदंबा कर्मचाऱयाच्या निवासस्थानी जाऊन अधिकारी दिलीप गावस यांच्या मार्गदर्शनाखाली निर्जंतुकीकरण फवारणी केली. यावेळी स्थानिक पंचसदस्य तथा भाजप मंडळ अध्यक्ष मधुकर परब उपस्थित होते. दरम्यान, पेडणे अग्निशामक दलाकडून पालये गावातील सार्वजनिक ठिकाणाचेही निर्जंतुकीकरण करण्यात आले.

Related Stories

ऊस उत्पादकांचे धरणे आंदोलन अखेर समाप्त

Omkar B

मगो पक्षाने अस्थित्वाची लढाई जिंकली..!

Amit Kulkarni

खलाशांच्या प्रश्नावर मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होईल : गुदिन्हो

Omkar B

आता जीव्हीएम सर्कलजवळ वाहनांचा गोंधळ व धोका..

Patil_p

प्रा.गोपाळराव मयेकर सरांच्या निधनाने नमस्काराचे पाय हरवले

Amit Kulkarni

राज्यातील रेल्वे स्थानकांवर लवकरच कोरोना चाचणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!