तरुण भारत

मनपातर्फे मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर

प्रतिनिधी / पणजी

पणजीमध्ये महापालिकेतर्फे मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसात कुणाला नुकसान किंवा त्रास होऊ नये तसेच पडझड होऊ नये म्हणून शहरातील अनेक मार्गावरील झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्यात आल्या आहेत. पाणी तुंबू नये म्हणून मिरामार ते बालभवनच्या रस्त्याच्या बाजूच्या गटाराचे उंची वाढविण्याचे कामही  सुरू करण्यात आले आहे.

Advertisements

मिरामार ते बालभवनच्या रस्त्यानजीकच्या गटाराची उंची आणि सौंदर्यीकरणाचे काम महापालिकेतर्फे करण्यात आले असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

पणजी शहरातील गटारांच्या साफसफाईचे कामही सध्या सुरू आहे. परंतु गटारातून आडव्या गेलेल्या केबल्स या काम करताना कामगारांना डोकेदुखी ठरत आहे. मिरामार येथील मेरियॉट हॉटेलच्या बाजूच्या गटारांची साफसफाई सुरू असून त्या गटारात आडवे असलेले विविध विभागाचे केबल्स गटारे साफ करण्यात अडथळा बनत आहेत. या केबल्समुळे गटारातून पाणी जाणे कठीण होते आणि पावसाळय़ात पाणी तुंबते. त्यामुळे या केबल्स लवकरच काढण्यात येणार आहे. याशिवाय ज्या ज्या विभागाच्या केबल्स त्यांना याबाबत सूचना देऊन त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मडकईकर यांनी दिली.

गटाराबरोबरच फुटपाथचेही काम सुरू आहे. 18 जून रस्ता, मळा पणजी येथील  जलस्त्राsत खात्याचेही काम सुरू आहे. पावसात मळय़ात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. पाणी तुंबू नये म्हणून काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती मडकईकर यांनी दिली.

Related Stories

डिचोली नगरपालिकेची प्रभाग संख्या वाढण्याची शक्यता ?

Patil_p

वेरोडा-कुंकळळीत आज ‘शब्द सुरांचे देणे’

Amit Kulkarni

कमिशनसाठी मंत्री गुदिन्होंची मीटर सक्ती

Patil_p

मांगोरहिलचे भवितव्य काय?

Patil_p

कोविड-19 मुळे गोव्यातील डॉक्टर मानसिक तणावाखाली

Omkar B

लॉकडाऊन काळात बेघर झालेल्या वृध्देची वृध्दाश्रमात रवानगी

Omkar B
error: Content is protected !!