तरुण भारत

कोरोची येथे अपघातात एकाचा मृत्यू

वार्ताहर / यड्राव

कोरोची तीन विहीर कॉर्नर हॉटेल समोर टूव्हीलर ला आयशर ओव्हरटेक करीत असताना टू व्हीलर स्लीप होऊन टुव्हीलर चालक आयशर गाडीच्या मागच्या चाकाखाली गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला मृत सुरेश येसणे सूर्योदय नगर भारत माता सोसायटी इचलकरंजी येथील आहेत.

Advertisements

कोरोची येथे इचलकरंजी हातकणंगले मेन रोडवरील तीन विहीर कॉर्नर हॉटेल समोर टू व्हीलर प्लेजर ( एम एच 09 सि सि 47 72 ) इचलकरंजी येथून हातकणंगले येथे कामावर जात असताना सुरेश यशवंत येसणे ( वय वर्ष 59 ) हातकणंगले पंचायत समिती बांधकाम विभाग येथे सर्विस करीत असून कामावर 3 विहीर कॉर्नरला आठ चाकी आयशर ( क्रमांक एम एच 12 पी क्यू 0618 ) इचलकरंजीहून हातकणंगलेकडे चालला होता कॉर्नरला टूव्हीलर चालकास ओव्हरटेक करत असताना टूव्हीलर गाडी स्लीप झाली व आयशर गाडीच्या मागच्या चाकाखाली टूव्हीलर चालत गेला त्याचा जागीच मृत्यू झाला सदर घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली असून अपघात घटनेची वार्ता सर्वत्र पसरल्याने नागरिकांनी गर्दी केली होती.

सूर्योदय नगर भागातील नगरसेवक मनोज हिंगमिरे सयाजी चव्हाण बाबासाहेब कोरे पोलीस पाटील मारुती हेगडे यांनी येऊन पहानि केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली घटनास्थळी शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश निकम त्यांच्या टीमने येऊन रस्त्यावरील गर्दी पांगवली आणि आयशर चालकास ताब्यात घेण्यात आले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह इचलकरंजी आयजीएम रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. शव विच्छेदन करून अंतिम संस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले सदर घटनेची नोंद शहापूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. मयत सुरेश येसने याच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे मयत सुरेश येसने हे हातकणंगले पंचायत समिती बांधकाम विभागात कामात होते ते अवघ्या चार महिन्यात रिटायरमेंट होणार होते अशी चर्चा घटनास्थळी पंचायत समिती बांधकाम विभागातील त्यांचे सहकारी मित्र करीत होते.

Related Stories

अफगाणिस्तानला 64 दशलक्ष डॉलर्सची मदत

Patil_p

खानापूर नगरपंचायत भाजपा स्वबळावर लढणार : आमदार पडळकर

Abhijeet Shinde

सांगली शहरचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहिर

Abhijeet Shinde

भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी – अर्थमंत्री

Patil_p

आयात करात सवलत विचाराधीन

Patil_p

23 जानेवारीपासून नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीसह होणार प्रजासत्ताक दिनाचा सोहळा

Sumit Tambekar
error: Content is protected !!