तरुण भारत

बार्शीतील ‘त्या’ शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न मिटला

तरुण भारत संवाद च्या पाठपुराव्याला यश

प्रतिनिधी / बार्शी

Advertisements


बार्शी येथील बार्शी एज्युकेशन सोसायटीच्या सुलाखे हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या प्रकाश कांबळे या शिक्षकास तब्बल अकरा वर्ष पगार मिळालेला नव्हता यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून कांबळे यांना कोणता न्याय न मिळाल्याने कांबळे या शिक्षकाने त्याच्या परिवारासह म्हणजेच पत्नी आणि दोन छोटी मुले यांच्यासह घरिच आमरण उपोषण चालू केले होते . मात्र प्रशासन या उपोषणाची दखल घेत नव्हते तसेच सुलाखे हायस्कूल आणि संस्था यांनी याप्रकरणी दखल न घेतल्याने त्या कुटुंबा पुढे जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र ही बातमी समजताच दैनिक तरुण भारत संवाद ने या बातमीला प्रसिद्धी दिली आणि तसेच प्रशासनाला जाब विचारला तेव्हा प्रशासन निद्रिस्त अवस्थेतुन जागे होऊन तात्काळ त्याच्या घरी पोहोचले आणि या आनोदलकाच्या पाठीशी लढा उभा राहिला. आज सोलापूर शिक्षणाधिकारी माध्यमिक सुधा साळुंखे यांनी या शिक्षकांचे प्रलंबित असणारे देयक सुलाखे हायस्कूल कडून स्वीकारून ते संबंधित विभागात पाठवले असून अक्का अकरा वर्ष पगार न मिळाल्या शिक्षकास आज नऊ वर्षाची पगार देण्याचे आदेश आज पारित झाले आहेत त्यामुळे गेली नऊ दिवस या कुटुंबाचे चालू असणारे उपोषण स्थगित करण्यात आले असून त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

सविस्तर वृत्त असे की 4 जून पासून बार्शीतील सुलाखे हायस्कूल शाळेतील प्रकाश कांबळे हे शिक्षक अकरा वर्षे पगार न मिळाल्याने आपल्या घरीच उपोषणास बसले होते या प्रकरणांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक यांनी शासनाकडे कांबळे यांचे वेतन देयक वेळोवेळी व नियमित न पाठवल्याने त्यांची पगार होत नव्हते. मात्र या प्रकरणात सोलापूर शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे आणि त्यांचे सहकारी सहाय्यक शिक्षक उपनिरीक्षक मिलिंद मोरे यांनी वारंवार सूचित करूनही ही देयक दिले नव्हते यामुळे सोलापूर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी या शाळेतील सर्व शिक्षकांचे पगार थांबवण्याचे आदेश पारित केले होते. यानंतर आज दिनांक 11 जून रोजी याची तात्काळ दखल घेत सुलाखे हायस्कूल चे मुख्याध्यापक पाटकुलकर यांनी या शिक्षकांचे वेतन देयक शासनास सादर केले आहे हे वेतन देयक सादर झाल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी ते देयक अधिक्षक वेतन व भविष्यनिर्वाह निधी यांना पुढील मंजुरीसाठी पाठवले असून आता प्रकाश कांबळे या शिक्षकाच्या नऊ वर्षाचा पगार जमा होणार असल्याची माहिती सुधा साळुंके यांनी दिली. दैनिक तरुण भारत संवाद या उपोषण प्रकरणाची प्रसिद्धी दिल्याने आणि वारंवार पाठपुरावा केल्याने या शिक्षकास समाजातील विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला होता तर तसेच अनेक संघटनांनी या प्रकरणी निर्णय व्हावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही दिला होता. त्यामुळे या प्रकरणात गती येऊन तब्बल 11 वर्षे पगार न मिळालेल्या शिक्षकास त्याच्या सेवेच्या नऊ वर्षाची पगार देण्याचा निर्णय आज शिक्षणाधिकारी यांनी घेतला आहे. हा निर्णय आल्यानंतर प्रकाश कांबळे यांनी आपल्या कुटुंबासह सुरू असलेले आमरण उपोषण सोडले यावेळी बार्शी पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब नाईकनवरे , पोलीस कॉन्स्टेबल संजय खैरे यांच्या हस्ते उपोषण स्थगित करण्यात आले.

कुपोषण कर्त्यास मिळालेला पाठिंबा

तब्बल अकरा वर्ष पगार न मिळालेल्या प्रकाश कांबळे या शिक्षकाने आपल्या कुटुंबासह चालू केलेल्या आमरण उपोषणात बार्शी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अविनाश गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे धनंजय जगदाळे, अजित कांबळे, भारत मुक्ती मोर्चाचे तानाजी बोकेफोडे, सुजितत बोकेफोडे , अक्षय साळुंके , मनोज सोनवणे, हाजी कांबळे व इतर सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी यावेळी पाठिंबा देऊन विविध प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

उपोषणकर्ते कुटुंबाने मानले तरुण भारत संवाद चे आभार

तब्बल 11 वर्षे पगार मिळालेल्या प्रकाश कांबळे या शिक्षक शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबाचे नऊ दिवसांपासून चालू असलेले उपोषण याची दखल दैनिक तरुण भारत संवाद घेतले आणि या घटनेचा पाठपुरावा करून प्रशासन आवडती नैतिक दबाव आणि विचारल्यामुळे आज्या शिक्षकाचे पगार देण्याचे आदेश पारित झाले आहेत आहेत त्यामुळे या प्रकरणी या कुटुंबाच्या पाठीशी दैनिक तरुण भारत संवाद राहिल्याने या कुटुंबाने सोलापूर आवृत्ती दैनिक तरुण भारत संवाद चे आभार मानले.

खासदार खासदार ओमराजे यांनी घेतली होती दखल


बार्शीतील प्रकाश कांबळे या शिक्षकाने अकरा वर्षे पगार न मिळाल्यामुळे साधू केलेल्या उपोषणाची बातमी दैनिक तरुण भारत संवाद च्या माध्यमातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबतची अधिक माहिती घेतली आणि सोलापूर शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून तात्काळ या शिक्षकांचा विषय मार्गी लावा अशा सूचना दिल्याने या उपोषणकर्त्यांची कुटुंबात न्याय मिळाला आहे.

Related Stories

‘डेल्टा प्लस’बाबत चिंता नको– राजेश टोपे

Abhijeet Shinde

दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान व विमा वाटप

Abhijeet Shinde

वडूथमध्ये युवकाचा पाय तोडून खून

Patil_p

कोल्हापूर जिल्हय़ात नवीन 19 केविड केअर सेंटरची उभारणी

Abhijeet Shinde

आणखी एका बोगस डॉक्टरला अटक

Patil_p

रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा न घेताच परतले मोदी

Sumit Tambekar
error: Content is protected !!