वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
शाओमी कंपनीकडून विविध प्रकारची उत्पादने बाजारात आणली जात आहेत. सध्या कंपनीने भारतीय बाजारात नोटबुक 14 आणि एमआय नोटबुक 14 होरायजन आवृत्तीचे सादरीकरण केले आहे. या उत्पादनासोबत शाओमीने देशात लॅपटॉप सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही लॅपटॉपची 10 वी आवृत्ती जनरल इंटेल कोर प्रोसेसरसोबत येणार आहे.
शाओमी 17 जूनपासून सदर उत्पादनाची विक्री ऍमेझॉन, एमआय डॉट कॉम, एमआय होम स्टोअर्स आणि एमआय स्टूडिओच्या माध्यमातून देशात करणार आहे.
एमआय नोटबुक 14 आवृत्ती
भारतात एमआय नोटबुक 14 चे 256 जीबी एसएसडी मॉडेल 41,999 रुपयांना आणि 512 जीबी एसएसडी मॉडेलची किमत 44,999 रुपये राहणार आहे. नविडिया जीफोर्स मॅक्स 250 जीपीयूच्या लॅस मॉडेलची किंमत 47,999 रुपये आहे.
एमआय नोटबुक 14 होरायजन आवृत्ती :
या मॉडेलला इंटेल कोर आय-5 असून याची किंमत 54,999 रुपये असून यामध्ये इंटेल कोर आयö7 पर्याय उपलब्ध होणार असून सदरची किमत 59,999 रुपये ठेवली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.