तरुण भारत

राष्ट्रवादीची ‘स्वाभिमानी’ला आमदारकीची ऑफर

प्रतिनिधी / कोल्हापूर

गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानतंर शिवसेनेला बरोबर घेऊन राज्यात सत्ता घडविणाऱया शरद पवार यांनी आपली चाणक्यनीती दाखवून दिली होती. याच पवारांनी आता विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक नवा गेमप्लॅन आखला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पवारांनी थेट आमदारकीची ऑफर दिली आहे. स्वाभिमानीचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी या ऑफरवर कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीने आपल्याला ऑफर दिल्याच्या वृत्ताला दुजोरा देत शेट्टी यांनी राज्य कार्यकारणीतील सदस्यांची मते आजमावून घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ‘तरुण भारत’ शी बोलताना स्पष्ट केले.

Advertisements

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी नुकतीच राजू शेट्टी यांची त्यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी भेट घेतली. राजू शेट्टी यांच्या मातोश्रींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जयंत पाटील गेले होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ऑफर शेट्टी यांना सांगितली. विधानपरिषदेचे सदस्य आपण स्वीकारावे, अशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची इच्छा असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर शेट्टी यांनी स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीतील सदस्यांशी चर्चा करून त्यांची मते घेतल्यानंतर आपल्याला निर्णय कळवितो, असे जयंत पाटील यांना सांगितले. त्यामुळे शेट्टी यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. महावीर आक्कोळे यांच्यावर जबाबदारी

राष्ट्रवादीकडून ऑफर आल्यानंतर स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्याशी बोलण्याची, त्याची मते जाणून घेण्याची जबाबदारी डॉ. महावीर आक्कोळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी सर्वांशी संपर्क सुरू केला आहे. दोन दिवसांत डॉ. आक्कोळे आपला अहवाल देणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानीच्या सूत्रांनी दिली.

स्वाभिमानीला बळ मिळणार?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी भाजप प्रणित एनडीएमधून लढले होते. संसदेतही पोहचले होते. पण नंतर त्यांचे मोदी सरकारशी बिनसल्यानंतर ते एनडीएतून बाहेर पडले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी शिवसेना-भाजपचे उमेदवार धैर्यशिल माने यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही स्वाभिमानीची जादू चालली नाही. पण सध्या महाविकास आघाडी सरकारबरोबर असणाऱया शेट्टी यांना आघाडीधर्म म्हणून विधानपरिषदेची ऑफर शरद पवार यांनी दिली असली तरी त्यामागे गेमप्लॅन असणार आहे. त्याची चर्चा सुरू झाली आहे.

संधी कुणाला मिळणार?

राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या सदस्यात्वाची ऑफर दिल्यानंतर राजू शेट्टी स्वतः आमदार होणे पसंद करणार की आपल्या इतर सहकाऱयांना संधी देणार? या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. शेट्टी यांच्या बरोबरच अनिल उर्फ सावकर मादनाईक, प्रा. जालंदर पाटील, रविकांत तुपकर यांच्याही नावाची चर्चा आहे.

Related Stories

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कोरोनावर मात!

Rohan_P

मौत से आँख मिलाने की जरुरत क्या है

Patil_p

नारायण राणेंचा एकनाथ शिंदेंबद्दल गौप्यस्फोट; विनायक राऊत म्हणतात..

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सर्पदंश झालेल्या बालकाचा उपचारा अभावी मृत्यु

Abhijeet Shinde

पंजाबमधील आमदारांशी राहुल गांधी करणार आज चर्चा!

Rohan_P

आधार कार्ड ग्राह्य मानून धान्य पुरवठा करा – पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समिती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!