तरुण भारत

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


सलग सहाव्या दिवशी शुक्रवारी पेट्रोलची किंमत प्रति लिटर 57 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 59 पैसे वाढ झाली आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, मागील सहा दिवसात पेट्रोलचे भाव 3.31 रुपयांनी तर डिझेल चे भाव  3.42 रुपये इतके वाढले आहेत. शुक्रवारी पुन्हा भाव वाढल्यानंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत 74 रुपयांवरून 74.57 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तर डिझेलची किंमत 72.22 रुपयांवरून 72.81 रुपये झाली आहे.

 
कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत अनुक्रमे 76.48, 81.53 आणि 78.47 रुपये झाली आहे . तर डिझेलच्या किंमतीत देखील वाढ झाल्याने या महानगरांना आता अनुक्रमे 68.70, 71.48 आणि 71.14 रुपये मोजावे लागणार आहेत. 


कोरोना संकटाबरोबरच सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्व सामान्यांना महागाईचा झळ सहन करावी लागणार आहे. पेट्रोल डिझेल मध्ये सतत वाढ झाल्यावर नेटकऱ्यांनी  सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली. तर ट्विटर वर सध्या 3.31 हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. 

Related Stories

मॅन व्हर्सेस वाईल्डमध्ये रजनीकांत

Patil_p

कोरोना : इम्यून सिस्टीम पॅटर्नचा शोध

datta jadhav

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल: सर्वोच्च न्यायालय

Abhijeet Shinde

धोका वाढला : उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांनी पार केला 27 हजारांचा टप्पा

Rohan_P

गुगल पिक्सल 6 लाँच

Patil_p

गेल्या 24 तासांत देशात 30,773 कोरोनाबाधित

Patil_p
error: Content is protected !!