तरुण भारत

बीड शेड परिसरातील चार युवकांना कोरोनाची लागण

प्रतिनिधी / कसबा बीड

करवीर तालुका कसबा बीड येथील बीड शेड येथे एकाच ठिकाणी कामाला असणाऱ्या चार युवकांना कोरोनाची लागण झालेली आहे. सदर युवक हे बीड शेड, गर्जन, सडोली दुमाला, पासार्डे या गावातील आहेत. या युवकांनी गुरुवारी डॉक्टर धनाजी लाड कोविड सेंटर येथे 20 स्वाब घेतले होते. त्यापैकी 16 निगेटिव्ह तर 4 पॉझिटिव्ह आले आहेत. करवीर पश्‍चिम भागामध्ये प्रथमच कोरोनाचा शिरोली आरोग्य केंद्र व सांगरूळ आरोग्य केंद्रात पेशंट सापडल्याचा प्रकार झाला आहे.

Advertisements

या चौघांच्या सहवासात आलेल्या सर्वांनी स्वतः होऊन आरोग्य विभागास सांगावे. कोरोना संसर्गजन्य रोगाची साखळी तोडावी व आपले आणि इतरांच्या आरोग्य जपावे असा संदेश आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.

Related Stories

आज ‘नीट’ची परीक्षा

datta jadhav

गगनबावडा तालुक्यातील अवैध व्यवसाय तात्काळ बंद करा

Abhijeet Shinde

माढा तालुक्यात आज १२ जण कोरोना पॉझिटीव्ह

Abhijeet Shinde

साहसी पर्यटनाबाबत लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार – आदित्य ठाकरे

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात मनरेगाची कामे नगण्य

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 43 रूग्ण, 34 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!