तरुण भारत

भारत – नेपाळ सीमेवार गोळीबार; एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी

ऑनलाईन टीम / सीतामढी : 


बिहारमधील सीतामढीमध्ये भारत – नेपाळ सीमेजवळ नेपळकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, जानकीनगर बॉर्डरवर नेपाळ पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यामध्ये जवळील शेतात काम करत असलेल्या एका भारतीय व्यक्तीला गोळी लागली असून त्यामध्ये त्याचा मृत झाला आहे. तर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


नव्या नकशावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला असून सध्याच्या स्थितीला दोन्ही बॉर्डर वर पोलिस तैनात आहेत. जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Related Stories

दीपक पाऊसकर यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

Sumit Tambekar

राष्ट्रीय शिक्षण धोरणावर चर्चेसाठी तयार- मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Shinde

मुंब्रा येथील प्राइम रुग्णालयाला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू

Rohan_P

फिरोजपूर घटनेची चौकशीसाठी पंजाब सरकारने उच्चस्तरीय समिती केली स्थापन

Sumit Tambekar

माफी न मागण्यावर प्रशांत भूषण ठाम

Patil_p

‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदीत प्रेतांचा खच’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!