तरुण भारत

पाकव्याप्त काश्मीर भारतात दाखवल्यामुळे दोन पाकिस्तानी पत्रकारांना नारळ

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानातील पीटीव्ही न्यूज चॅनेलने वृत्तांकन करताना नकाशात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे दाखवल्याने दोन पत्रकारांना नोकरी गमावण्याची वेळ आली. 

Advertisements

पाकिस्तान सरकारच्या मालकीचे पीटीव्ही हे न्यूज चॅनेल आहे. 6 जून रोजी या चॅनलने कोरोना विषाणूसाठी बनविलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून पीओकेचा एक नकाशा प्रसिद्ध केला. या नकाशात पाकव्याप्त काश्मीर भारताच्या हद्दीत दाखवण्यात आला होता. त्याचा भारत आधीच दावा करत आला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर पाकचे पंतप्रधान इम्रान खान सर्व स्तरातून ट्रोल झाले होते. 

या वृत्तानंतर पीटीव्हीने निवेदन दिले होते की, मानवी चुकांमुळे पाकिस्तानचा नकाशा चुकीचा दाखविण्यात आला. हा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यानंतर 8 जूनला पाकिस्तानी संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणासाठी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर संबंधित दोन पत्रकारांवर कारवाई करण्यात आली.

Related Stories

पुणे : दौंड तालुक्यात पुराच्या पाण्यात 4 जण गेले वाहून

Rohan_P

ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही : उपमुख्यमंत्री

triratna

राजस्थान : खाजगी रुग्णालय आणि लॅबमध्ये होणार 2200 रुपयांमध्ये कोरोना टेस्ट

Rohan_P

मिझोराम राज्याने वाढवला आणखी दोन आठवडे संपूर्ण लॉक डाऊन

Rohan_P

कित्येक तास काम केल्यावर रडतच घरी परततो!

Patil_p

पदभार स्वीकारताच नारायण राणेंची मुख्यमंत्री आणि संजय राऊतांवर टीका

triratna
error: Content is protected !!