तरुण भारत

पंजाबमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू, 82 नवे रुग्ण 

ऑनलाईन टीम / चंदीगड : 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच पंजाबमध्ये मागील चोवीस तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 82 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकुण संख्या 2887 झाली आहे. 

Advertisements


आरोग्य विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, मागील चोवीस तासात पठाणकोटमध्ये सर्वात जास्त 19 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामधील 14 जण हे पहिल्या पासूनच आहेत. तर 5 रुग्ण नवीन आढळून आले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर लुधियाना असून तेथील 18 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 18 मधील एक जण दिल्लीतून तर जण विदेशातून आला आहे. विदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या 7 जणांना ही कोरोनाची बाधा झाली असून 9 नवे रुग्ण आढळले आहेत.


अमृतसर मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 14 आहे. त्यात मुंबईतून आलेला एक जण आणि बाकी नवीन रुग्ण आहेत. संगरुरमध्ये देखील 10 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर पटियालामध्ये 6, मोगा व नवांशहर मध्ये 2-2 , मोहालीमध्ये 4 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

आता पर्यंत संपूर्ण राज्यात 1 लाख 54 हजार 498 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. तर विविध रुग्णालयात 569 लोकांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील 2259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Related Stories

चिनी नागरिकाचा भारतातील घोटाळा उघडकीस

Patil_p

पंतप्रधान मोदींनी केला बायडेन यांना फोन; ‘या’ मुद्यांवर झाली चर्चा

datta jadhav

गुरदासपूरमधील सीमेवर 11 ग्रेनेड हस्तगत

Patil_p

पंजाबमध्ये मागील 24 तासात 582 नवे कोरोनाबाधित

pradnya p

Video : अन् ‘ते’ शब्द कानावर पडताच स्टॅलिन यांच्या पत्नीला अश्रू अनावर

triratna

‘कोरोना कॉलर टय़ून’ विरोधात याचिका

Patil_p
error: Content is protected !!