तरुण भारत

योगी आदित्यनाथ यांचे सरकारी निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

ऑनलाईन टीम / लखनऊ : 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कालिदास मार्गावरील सरकारी निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर प्रशासनाने तातडीने निर्णय घेत निवासस्थानासह कालिदास मार्गावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यावर प्रशासनाकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास केला जात आहे.

तसेच सुरक्षेच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे गेट बंद करण्यात आले आहे. निवासस्थानाजवळ पोलीस तैनात असून विक्रमादित्य मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. 


दरम्यान, यापूर्वीही योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. ही धमकी देणाऱ्या युवकाला मुंबईतून अटक करण्यात आली होती.  

Related Stories

दहशतवाद संपवण्यासाठी अमेरिकेच्या मार्गावर चालावं लागेल : बिपीन रावत

prashant_c

भारतात कोरोनाबाधितांनी गाठला 25 लाखाचा टप्पा

datta jadhav

ड्रग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी

Patil_p

प्रत्येक नागरिकाला कोरोना लस

Patil_p

“दिल्लीत येण्याची माझी इच्छा नव्हती”: गडकरी

Abhijeet Shinde

देशात 24 तासात 89,706 नवे बाधित

Patil_p
error: Content is protected !!