तरुण भारत

टाटा पॉवर २१२.७६ मिलियन यूएस डॉलर्सना विकणार जहाजे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या ट्रस्ट एनर्जी रिसोर्सेस पीटीई लिमिटेड (टीईआरपीएल) या सिंगापूर-स्थित कंपनीने तीन जहाजांच्या विक्रीसाठी ओल्डेनडॉर्फ कॅरियर्स जीएमबीएच अँड कंपनी केजी, जर्मनी सोबत अंतिम करार केला असून, त्याची अनुमानित किंमत २१२.७६ मिलियन यूएस डॉलर्स आहे. 

Advertisements

एमव्ही ट्रस्ट एजिलिटी, एमव्ही ट्रस्ट इंटेग्रिटी आणि एमव्ही ट्रस्ट अमिटी या सध्या टीईआरपीएलच्या मालकीच्या तीन जहाजांच्या विक्रीचा हा व्यवहार त्यासाठी आवश्यक सर्व नियामक मंजुरी मिळाल्यास पुढील तीन ते चार आठवड्यांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या शिपिंग संबंधी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ऍसेट-लाईट मॉडेल वापरले जावे, हा या व्यवहाराचा उद्देश आहे. विक्रीतून मिळणारी रक्कम कंपनीची कर्जे कमी करण्यासाठी वापरली जाणार आहे. कंपनीच्या एकंदरीत पुनर्रचना योजनेचा भाग म्हणून हे पाऊल उचलले जात आहे.

टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, आज घोषित करण्यात आलेली आमच्या जहाजांची विक्री ही कर्ज कमी करणे आणि आमच्या भविष्यातील विकास योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भांडवल उभे करण्याच्या दीर्घकालीन योजनांना अनुसरून आहे, यामध्ये शुद्ध ऊर्जा उद्योगात आमचे स्थान अधिक बळकट करण्यासाठीच्या योजनांचाही समावेश आहे. पुढील एक दशकातील विकासाचा आराखडा आखण्यासाठी टाटा पॉवरमध्ये पुनर्रचना घडवून आणण्याच्या प्रक्रियेचा देखील हा एक भाग आहे.
या विक्रीमध्ये मेसर्स ओल्डेनडॉर्फ कॅरियर्स जीएमबीएच अँड कंपनी केजी, जर्मनी सोबत जहाजांशी संबंधित दीर्घकालीन कॉन्ट्रॅक्टचा देखील समावेश आहे.  ही जगातील सर्वात मोठ्या ड्राय-बल्क शिपिंग कंपन्यांपैकी एक आहे.

Related Stories

सुझुकीची नवी गिक्सर 250 बाजारात

Omkar B

‘एलजी’कडून नवा प्रोजेक्टर लाँच

Omkar B

5-जी परीक्षणासाठी दूरसंचार कंपन्यांकडून तयारी सुरु

Omkar B

पिरामलला मिळाला हिरवा कंदील

Patil_p

भारताची औषध निर्यात 18 टक्के वाढली

Patil_p

खादी आउटलेटमधून 1.2 कोटींची कमाई

Patil_p
error: Content is protected !!