तरुण भारत

सिंगापूर, जपान, अझरबैजान ग्रां प्रि शर्यती रद्द

वृत्तसंस्था\ सिंगापूर

कोरोना महामारी संकटामुळे 2020 च्या एफ-1 ग्रां प्रि मोटार रेसिंग हंगामातील सिंगापूर, जपान आणि अझरबैजान येथे होणाऱया शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत.

कोविड-19 प्रतिबंधक नियमावलीमुळे अझरबैजान आणि सिंगापूर येथे होणाऱया एफ-1 शर्यतीसाठीचा मार्ग तयार करणे अवघड असल्याने अखेर या स्पर्धा रद्द कराव्या लागत आहेत. तसेच जपानमध्ये प्रवासावर बंधन घातल्याने जपान ग्रां प्रि शर्यत रद्द करावी लागत आहे. एफ-1 रेसिंग क्षेत्रातील अझरबैजान, जपान आणि सिंगापूर येथील स्पर्धा प्रमोटर्सना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या शर्यतीच्या मार्गावरील रस्ते तयार करताना काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे यजमान अझरबैजान आणि सिंगापूर यांनी एफ-1 मोटार शर्यती भरविता येणे अशक्मय असल्याचे कळविले आहे.

अलीकडेच एफ-1 ग्रां प्रि मोटार रेसिंग फेडरेशन 2020 च्या एफ-1 हंगामाच्या फेरबदल केलेल्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या वेळापत्रकानुसार पहिल्या आठपैकी दोन शर्यती ऑस्ट्रियात घेतल्या जाणार आहेत. फेरबदल केलेल्या 2020 च्या एफ-1 रेसिंग हंगामाला 7 जुलैपासून प्रारंभ होईल. गेल्या मार्चमध्ये ऑस्ट्रेलियन ग्रा. प्रि. शर्यतीने या हंगामाला प्रारंभ होणार होता. पण कोरोनामुळे हॉलंड, मोनॅको, फ्रान्स येथील शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एफ-1 मोटो स्पोर्ट्सचे प्रमुख रॉस बेव्हेन यांनी दिली.

Related Stories

न्यूझीलंड युवा संघ उपांत्य फेरीत

Patil_p

ताजिकिस्तानमधील फुटबॉल हंगाम तहकूब

Patil_p

निदर्शक ऍथलिट्सना रोखले राष्ट्रपती भवनाच्या मार्गावर

Patil_p

बुचार्डची विजयी सलामी, पावसाचा अडथळा

Patil_p

दोन ‘रॉयल्स’ संघ आज पुन्हा आमनेसामने

Patil_p

हाय परफॉर्मन्स डायरेक्टर व्होकर हर्मन यांचा राजीनामा

Omkar B
error: Content is protected !!