तरुण भारत

राजेश कुमार यांची ‘द्रोणाचार्य’साठी शिफारस

माजी राष्ट्रीय मुष्टियुद्ध प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू यांनी केली शिफारस

नवी दिल्ली

Advertisements

भारताचे माजी राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू यांनी राष्ट्रकुल पदकविजेता बॉक्सर मनोज कुमारचा मोठा भाऊ व त्याचे खासगी प्रशिक्षक राजेश कुमार यांची द्रोणाचार्य पुरस्कारांसाठी शिफारस केली आहे.

संधू हे माजी पुरस्कारविजेते असल्याने त्यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडूंची शिफारस करण्याचा अधिकार आहे. 37 वर्षीय राजेश कुमार हे एआयबीए 2 स्टार प्रशिक्षक असून मनोज कुमारची कारकीर्द घडविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. ते सध्या कुरुक्षेत्र विद्यापीठात काम करीत असून खेलो इंडिया युनिव्हर्सिटी क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये त्यांनी या विद्यापीठाला अग्रस्थान मिळवून दिले होते. ‘बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून राजेश कुमार यांनी जी कामगिरी केली आहे, ती द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्याकरिता पुरेशी आहे,’ असे संधू यांनी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. आशियाई चॅम्पियनशिपमधील माजी पदकविजेता असलेल्या मनोज कुमारनेही त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

‘आज मी जो काही आहे ते त्याच्यामुळेच. मुष्टियुद्ध कारकिर्दीत अनेक वाईट टप्पे आले होते. पण राजेशच्या प्रयत्नामुळेच मी त्यातून बाहेर पडू शकलो. आमचे नाते हे गुरु-शिष्यासारखे असून तो माझ्यासाठी द्रोणाचार्यच आहे,’ अशा भावना मनोज कुमारे व्यक्त केल्या. संधू यांनी शिफारस केल्याबद्दल राजेश कुमार यांनीही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘द्रोणाचार्यसारख्या पुरस्कारासाठी शिफारस करून त्यांनी माझ्या योग्यतेचा सन्मानच केला आहे. त्यांच्याकडून मी बरेच काही शिकलो असून त्यांच्यामुळेच भारतीय मुष्टियुद्ध क्षेत्रात मोठा बदल घडला आहे,’ असेही ते म्हणाले. भारतीय मुष्टियुद्ध फेरडेशनने याआधी द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तीन प्रशिक्षकांची शिफारस केली असून त्यात महिला संघाचे प्रमुख प्रशिक्षक मोहम्मद अली कमर यांचाही समावेश आहे.

Related Stories

भारत-इंग्लंड यांच्यात पाच टी-20 सामने होणार

Patil_p

रवी शास्त्री म्हणतात, निवड समितीने रोहित शर्माला ‘या’ कारणासाठी वगळले!

Patil_p

गेम ईज ऑन! कॅसिनोवर आज ‘बॅटल ऑन शिप’चा थरार

Amit Kulkarni

ब्राझील विजयी, नेमारचा विक्रम

Patil_p

रशियाचा मेदव्हेदेव अंतिम फेरीत

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचे तीन क्रिकेटपटू आयसोलेशनमध्ये

Patil_p
error: Content is protected !!