तरुण भारत

विशेष आर्थिक मदतीची पंतप्रधानांकडे मागणी करणार

प्रतिनिधी/ मंडणगड

कोकणाला निसर्ग चक्रीवादळाची झळ प्रचंड प्रमाणात बसली आहे. त्यामुळे कोकणासाठी विशेष आर्थिक मदतीची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहे. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनाही कोकणातील नुकसानीची माहिती देऊन कोकणवासीयांना जास्तीत जास्त आर्थिक निधी उपलब्घ करुन देण्यासाठी आग्रह धरणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

Advertisements

  आठवले यांनी शुक्रवारी मंडणगड तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचा पाहणी दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्तांशी संवाद साधताना त्यांनी, निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून त्याला सावरण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राधान्यक्रमाने मोठय़ाप्रमाणात आर्थिक निधीची तरतदू करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

   यावेळी आठवले यांनी तालुक्यातील मंडणगड शहर, आंबडवे, सावरी, निगडी व तालुक्यातील अन्य नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. त्यांच्यासोबत दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, प्रितम रुखे, आदेश मर्चंडे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे, प्रांताधिकारी सोनोने, तहसीलदार नारायण वेगुर्लेकर, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे आदी उपस्थित होते.

Related Stories

लांजात आशानी पुकारले कामबंद आंदोलन

Patil_p

रत्नागिरीत २४ तासात ४६ नवे रुग्ण

Abhijeet Shinde

शिक्षण विभागातील भ्रष्टाचारात अजून बाराजण?

NIKHIL_N

जिल्हय़ातील मच्छी व्यवसाय ठप्प

tarunbharat

‘त्या’ माऊलीच्या झोळीत वाचकांचे अमूल्य दान

NIKHIL_N

दापोली एसटी आगारातील वाहतूक ठप्प

Sumit Tambekar
error: Content is protected !!