तरुण भारत

वनखात्यातर्फे रोप लागवडीला प्रांरभ

बेळगाव : /  प्रतिनिधी

पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनखात्यातर्फे दरवषी मोठय़ा प्रमाणात रोपलागवड करण्यात येते. यावषी पावसास प्रारंभ झाल्याने वनखात्याने बेळगाव विभागात रोप लागवडीला प्रारंभ केला आहे. गेल्या चार दिवसांपासून बेळगाव विभागासह खानापूर, बैलहोंगल, हुक्केरी, गोकाकमधील काही भागात रोपलागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Advertisements

   वनखात्यातर्फे दरवषी लाखो रोपांची लागवड करण्यात येते. मात्र विकास कामांसाठी मोठय़ा प्रमाणात जंगल तोड होते. त्यामुळे झपाटय़ाने झाडांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. याचा गंभीर परिणाम म्हणजे वाढते प्रदूषण होय. वाढती जंगलतोड व वन्यजीव संघर्ष अशा आव्हानांना तोंड देत वृक्षलागवड करावी लागत आहे. यंदाच्या हंगामात 6143 हेक्टरमध्ये तब्बल 37 लाख रोपे लावण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावषी 10 लाख रोपे जादा लावण्यात येणार आहेत. याबरोबर खरीप हंगामासाठी शेतकऱयांना विविध जातींची 4 लाख रोपे सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहेत.

 जिल्हय़ात सर्वाधिक वनक्षेत्र हे खानापूर तालुक्मयात असून या विभागातील जांबोटी, लोंढा, नागरगाळी, गोल्याळी आदी वन्यक्षेत्रात लागवडीला सुरूवात करण्यात आली आहे. विशेषकरून बांबू, सागवान, बाभूळ, गुलमोहोर, फणस, सिसम, जांभूळ आदी प्रकारच्या रोपांची लागवड केली जात आहे. गतवषी झालेल्या जोरदार पावसाने बरीचशी रोपे नष्ट झाली होती. त्याठिकाणी देखील नवीन रोपे लावण्यात येत आहेत. रोप लागवडीबरोबर रोपांची विशेष काळजी घेतली जात असून झाडाभोवती लोखंडी व बांबूचे कुंपण घातले जात आहे.

वनक्षेत्राबरोबर शहर व ग्रामीण भागातील जुनाट झाडे तोडलेल्या ठिकाणी, सरकारी जागेत, खुल्या जागेत, राज्यमार्ग व इतर ठिकाणी लागवड केली जात आहे. बेळगाव विभागात मच्छे, हलभावी, होसकोटी, शिरूर, खानापूर तालुक्मयातील ओतोळी, सावरगाळी, कणकुंबी, लोंढा नागरगाळी, गोल्याळी, आदी ठिकाणी असलेल्या नर्सरीतून रोपांची निर्मिती करण्यात येत आहे. तेथूनच विविध ठिकाणी ही रोपे पुरविली जात आहेत.

Related Stories

कपिलेश्वर उड्डाणपुलावर वाहतुकीची प्रचंड कोंडी

Amit Kulkarni

वडेरहट्टी येथील दोन मुलांना ‘जीवनरक्षा’ पदक

Patil_p

पत्रकार संघाकडे साईराज चषक

Amit Kulkarni

परिवहनच्या कुरिअर सेवेला वाढतोय प्रतिसाद

Amit Kulkarni

बेळवट्टी येथे ट्रक अपघातात युवक ठार

Amit Kulkarni

वृद्धांचे केशकर्तन करून जपली सामाजिक बांधिलकी

Amit Kulkarni
error: Content is protected !!