तरुण भारत

पंजाब : वीकेंडला संपूर्ण लॉक डाऊन, सीमाही सील होणार

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंजाब सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Advertisements


या निर्णयाबाबत अधिक माहिती देताना पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, आता  वीकेंड आणि सुट्टीच्या दिवशी संपूर्ण लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच पंजाबच्या सीमा देखील बंद ठेवल्या जातील. 


अधिक माहितीनुसार, पंजाबमध्ये आता शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवसांमध्येे केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. तसेच दुसर्‍या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर देखील प्रतिबंध लावण्यात आले आहेत. ज्यांच्याकडे पास उपलब्ध असतील अशाच लोकांना प्रवेेश दिला जाणार आहे. 


नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार, आता आवश्यक वस्तूंची दुकाने दररोज सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी आवश्यक सेवा देणारी दुकान वगळता इतर सर्व दुकाने पूर्ण वेळासाठी बंद असतील. तसेच लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी ई पास दिले जातील. यामध्ये केवळ 50 जणांना सहभाग घेता येणार आहे.

Related Stories

सहा संशयित दहशतवाद्यांना अटक

Patil_p

दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी 300 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण; 3 जणांचा मृत्यू

Rohan_P

मुलांना धोका असल्याचा पुरावा नाही !

Patil_p

भारतात मागील 24 तासात 26,506 नवे कोरोना रुग्ण, 475 मृत्यू

datta jadhav

राहुल गांधी यांचं ‘ते’ ट्विट ट्विटरने हटवले

triratna

धक्कादायक! लॉक डाऊनमध्ये केस कापण्यासाठी नकार दिल्याने न्हाव्याची हत्या

Rohan_P
error: Content is protected !!