तरुण भारत

बोहल्यावर चढलेल्या नक्षली महिलेला लग्नमंडपातून अटक

ऑनलाईन टीम / पटना : 

औरंगाबाद जिल्ह्यातील मदनपूर जंगलात नक्षली चळवळीचा प्रमुख चेहरा असलेल्या एका नक्षली महिलेला सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनने अटक केली. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेली ही महिला बोहल्यावर चढली होती. तिला लग्न मंडपातून ताब्यात घेण्यात आले.

Advertisements

पुष्पा उर्फ गौरी रामसूचित सिंग असे अटक करण्यात आलेल्या नक्षली महिलेचे नाव आहे. ही महिला लांगुरही गावची रहिवासी आहे. गुरुवारी या महिलेचे लग्न होणार होते. त्याचा पोलिसांना सुगावा लागला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून महिलेच्या घरावर छापा टाकून तिला घराबाहेरील लग्नमंडपातून अटक केली. 

या महिलेवर औरंगाबाद जिल्ह्यात 7 ते 8 नक्षली घटनांचे गुन्हे दाखल आहेत. ही सीपीआय या बंदी असलेल्या माओवादी संघटनेची सक्रिय सदस्या आहे. दोन्ही हातांनी AK 47 चालवण्यात या महिलेचा हातखंडा आहे.

Related Stories

लाल किल्ला हिंसाचार -इक्बाल सिंगला अटक

Patil_p

ब्रिटनच्या तुलनेत उत्तरप्रदेश सरस

Patil_p

दिल्लीत स्वस्त होणार आरटी – पीसीआर चाचणी

Rohan_P

बालकांसाठी सोशल मीडिया घातकच!

Patil_p

बंदर प्रकल्पांमध्ये अब्जावधींची गुंतवणूक

Patil_p

देशात 85 लाख रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

datta jadhav
error: Content is protected !!