तरुण भारत

लिपझिगचा हॉफेनहेमवर एकतर्फी विजय

वृत्तसंस्था/ बर्लीन

जर्मनीत सुरू असलेल्या बुंदेस्लिगा फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आरबी लिपझिग संघाने हॉफेनहेम संघाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला.

Advertisements

या सामन्यात लिपझिकतर्फे डॅनी ओल्मोने दोन गोल काही मिनिटांच्या कालावधीत नोंदविले. पहिल्या सामन्यातील 12 मिनिटांच्या कालावधीत हॉफेनहेमला पंचांनी दिलेला पेनल्टीचा निर्णय व्हीएआरने रद्द केला. आता या विजयामुळे या स्पर्धेतील गुणतक्त्यात लिपझिगने 31 सामन्यांतून 62 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत बायर्न म्युनिच 70 गुणांसह पहिल्या तर बोरूसिया डॉर्टमंड 63 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे.

हॉफेनहेम 43 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. 21 व्या मिनिटाला ओल्मोने लिपझिगचे खाते उघडले. त्यानंतर 23 व्या मिनिटाला त्याने आपला वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल केला. सामन्यांतील 65 मिनिटाला हॅट्ट्रीक नोंदविण्याची ओल्मोने संधी गमाविली. हॉफेनहेमला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.

Related Stories

कँडिडेट्स स्पर्धेत नेपोमनियाची विजेता

Patil_p

मुरली यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी

Patil_p

कोणी टाकला आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू?

Patil_p

नीरज चोप्रा खेलरत्नसाठी नामांकित

Patil_p

श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया

Patil_p

डीव्हिलियर्सचा निवृत्तीचा निर्णय कायम

Patil_p
error: Content is protected !!