तरुण भारत

एसपींचे साताऱयात सायकलिंग

सातारा / प्रतिनिधी

सातारा ते लिंबखिंड पर्यंत सायकलिंग करुन यातून व्यायामाबरोबरच फिजीकल डिस्टन्सिंग उत्तम प्रकारे राखता येत असल्याचा संदेश सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला. कोरोना संसर्गाच्या काळात स्वत:च्या  आरोग्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले असून यातून आरोग्याबरोबरच सातारा शहरातील वाहतुक पाहता येते असेही त्यांनी सांगितले.

Advertisements

एसपी तेजस्वी सातपुते या गुरुवारी सायंकाळी महामार्गालगत सर्व्हीस रस्त्यावर सायकलिंग करत असल्याचे सातारकरांच्या निदर्शनास आले. त्यांनी सायकलवर एसपी निवासस्थानापासून लिंबखिंडपर्यंत जावून येवून केले. आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी नुकतेच सायकलिंग सुरु केले आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘सध्या कोरोना संसर्गाचा आव्हानात्मक काळ सुरु आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जिम, व्यायामाला बंदी होती. याचे पालन करावे लागल्याने व्यायामाकडे दुर्लक्ष झाले. आता व्यायामाला परवानगी सुरु झाली आहे. आरोग्या तंदुरुस्त रहावे. कोरोनाशी लढता यावे. तसेच सायकलिंगमुळे फिजीकल डिस्टन्सिंग उत्तमप्रकारे राखता येते,’ असा महत्वपूर्ण संदेश त्यांनी यावेळी बोलताना दिला.

दरम्यान, पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्यांनीही दिवसातून किमान एक तास स्वत:साठी वेळ काढून व्यायाम, सायकलिंग, योगासने करावीत. या निमित्ताने कामातील उत्साह वाढण्यास मदत होईल, असाही सल्ला त्यांनी आपल्या पोसीस बांधवांना दिला आहे.

Related Stories

सातारा जिल्ह्यात 186 नागरिकांना दिला डिस्चार्ज, 617 नमुने पाठविले तपासणीला

triratna

तीन बहिणींच्या मृत्यू प्रकरणी अहवालाची प्रतीक्षा

Patil_p

सातारा : वरिष्ठ राष्ट्रीय कुस्तीस्पर्धेसाठी 10 जानेवारीला निवड चाचणी

datta jadhav

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बधितांचे शतक

triratna

आकलन, आस्वाद, अन्वय हे अध्यापनाचे उत्कृष्ठ तंत्र

Patil_p

कोरोनाचा कहर! मुंबई लोकलबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले…

pradnya p
error: Content is protected !!