तरुण भारत

जीसीएने मुलींच्या क्रिकेटला प्रोमोट करावं: नगराध्यक्ष रायन ब्रागांझा

म्हापसाः बार्देश तालुक्यातील शाळांना क्रिकेट किट्स वितरीत करताना नगराध्यक्ष रायन ब्रागांझा. बाजूला जीसीएचे माजी सचिव बाळू फडके व जीसीएचे सचिव विपुल फडके.

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

गोवा क्रिकेट संघटनेने मुलींच्या क्रिकेटला जास्त प्राधान्य दिले पाहिजे. राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. प्रोत्साहन मिळाले तर महिला क्रिकेटपटूंही याच्याहून अधिक चांगली कामगिरी करू शकतील, असे प्रतिपादन म्हापसाचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी केले.

काल म्हापसा येथील बोडगेश्वर देवस्थानच्या सभागृहात एका साध्या सोहळय़ात गोवा क्रिकेट संघटनेने 14 वर्षांखालील प्रेसिडेंट चषक आणि 16 वर्षांखालील दिलीप सरदेसाई क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या 13 शालेय संघांना क्रिकेट किट्स वितरित करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, जीसीएचे माजी सचिव बाळू फडके, जीसीएचे सचिव विपुल फडके तसेच सदस्य मोहन चोडणकर उपस्थित होते. बार्देश तालुक्याचे स्पर्धा समन्वयक सुशांत नाईक, तुळशीदास शेटय़े व विकास पार्सेकर यांचीही यावेळी उपस्थिती होती. सेंट ब्रिटो हायस्कूल, सॅक्रीडा हायस्कूल, सारस्वत विद्यालय, सेंट अँथनी हायस्कूल, सेंट इलिझाबेथ हायस्कूल, सेंट तेरेझा हायस्कूल, वसंत विद्यालय, शांता विद्यालय, आमोणकर हायस्कूल, ज्ञानप्रसारक विद्यालय, मंत्रवादी हायस्कूल, श्री राम विद्यालय आणि कोलवाळच्या सेंट रिटा हायस्कूलच्या क्रीडा शिक्षकांनी यावेळी क्रिकेट किट्स स्वीकारले.

  ज्ञानप्रसारक मंडळाकडे गोवा क्रिकेट संघटनेची क्रिकेट मैदानाच्या विकासासंदर्भात चर्चा सुरू आहे. कोरोनामुळे ही चर्चा पुढे होऊ शकली नाही. सर्व काही सुरळीत झाल्यानंतर जीसीए क्रिकेट मैदानाच्या बाबतीत निर्णय घेणार असल्याचे यावेळी विपुल फडके म्हणाले.

बार्देश तालुक्यात टर्फ खेळपट्टी असलेल्या क्रिकेट मैदानाची नितांत आवश्यकता आहे. या मोसमात जीसीएने बोडगेश्वर देवस्थानाच्या बाजूला तात्पुरते क्रिकेट मैदान आणि खेळपट्टी निर्माण करून शालेय सामनेही खेळविले. 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील सामने दोन दिवशीय करून कुमार क्रिकेटपटूंना चमकण्याची संधीही दिली. येत्या मोसमात स्पर्धा आयोजनाबाबत आणखी सुधारणा करण्यात येणार असल्याचे फडके म्हणाले. सर्वांचे स्वागत विपुल फडकेने तर आभार सुशांत नाईक यांनी मानले. 

Related Stories

भंडारी समाजाच्या आमंत्रणावरून केजरीवाल हरवळे रुदेश्वर मंदिरात

Amit Kulkarni

मुख्यमंत्री सावंतच सांखळी मतदारसंघाचे नेते

Amit Kulkarni

बाबू आजगावकर यांना पदावरून हटवा

Patil_p

गणेशोत्सव मंडळांनी कोरोनासंबंधी जनजागृती करावी

Patil_p

पर्यटन विकासार्थ विविध सेवा सुरू

Patil_p

गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा रिक्षा पकडला

Patil_p
error: Content is protected !!