तरुण भारत

शेतकऱ्याला शब्द आणि आमदारांचा स्वःखर्च

गोडोली/ प्रतिनिधी

वडूथ गाव बागायतदार असून पाणंद रस्ते नसल्याने मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. ही बाब आमदार महेश शिंदे यांना एका सामान्य शेतकऱ्यांने सांगताच “चला उद्याच कामाचा शुभारंभ करु या, “असा शब्द दिला आणि जरंडेश्वर रस्ता आणि चीलूबाई देवस्थान मुख्य पाणंद रस्त्यांच्या प्रत्यक्ष स्वःखर्चातून कामाला सुरुवात केली.

Advertisements

वडूथ गावातील पाणंद रस्ते सोईस्कर नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील माल वाहतूक करणे अवघड जाते. कित्येक वर्षांचा प्रश्न आजवरच्या एकाही नेत्याने मागणी करूनही सोडवला नाही. मात्र एका सामान्य शेतकऱ्यांने आमदारांना सहज विषय सांगितला आणि दुसऱ्याच दिवशी स्व:खर्चाने जरंडेश्वर रस्ता आणि चीलूबाई देवस्थानाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करुन शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. यावेळी सरपंच किशोर शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष साबळे, बबन साबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

महेश साबळेला मंत्री शंभूराजांची शाबासकी

Patil_p

सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबवणीवर

Omkar B

निसरे पुलावरून मुलगा वाहून गेल्याची भीती

Amit Kulkarni

राज्य चालविण्याचे कंत्राट शरद पवार यांच्याकडे : चंद्रकांतदादा पाटील

Abhijeet Shinde

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी कराडात

Patil_p

‘त्या ‘ बालकाच्या मदतीसाठी सरसावले बार्शीतले तरुण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!