तरुण भारत

अभिनेता सुशांतसिंह राजपुतची गळफास घेऊन आत्महत्या

ऑनलाईन टीम / मुंबई : 

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो 34 वर्षांचा होता. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. 

Advertisements

एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांतसिंह राजपूत प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘क्या पो छे!’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.  या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात त्याने महेंद्र सिंग धोनीची व्यक्तिरेखा साकारली होती.

याशिवाय सुशांतने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Related Stories

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; परभणीत तब्बल 800 कोंबड्यांचा मृत्यू

Rohan_P

45 वर्षापुढील व्यक्ती,कोविड योद्धे लसीकरण केंद्रात जाऊन दुसरा डोस घेऊ शकतात-किशोरी पेडणेकर

Abhijeet Shinde

पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून; महापालिकेकडून नियमावली जाहीर

Rohan_P

डॉक्टरांनी दवाखाने सुरु करण्याकरीता गणेश मंडळाचा हातभार

tarunbharat

पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत- कंगना राणावत

Abhijeet Shinde

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स

Rohan_P
error: Content is protected !!