22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

मुंबईतच देशातील 23 टक्के बळी

अमेरिकेतील 22 टक्के मृत्यू न्यूयॉर्कमध्ये : मुंबईतील स्थिती अधिक चिंताजनक : आरोग्य व्यवस्था पडतेय अपुरी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोरोनाचे सर्वात गंभीर संकट झेलत आहे. केवळ मुंबईतच 13 जूनपर्यंत कोरोनाचे 55 हजार 451 रुग्ण सापडले आहेत. तर महाराष्ट्रात बाधितांचा आकडा 1 लाखांपेक्षा अधिक झाला आहे. महाराष्ट्रात 3 हजार 717 जणांचा मृत्यू झाला असून यातील 55 टक्के म्हणजेच 2 हजार 44 बळी केवळ मुंबईतच गेले आहेत. देशातील 17 टक्के रुग्ण मुंबई शहरातच आहेत. तर देशातील एकूण 23 टक्के कोरोनाबळी मुंबईतच गेले आहेत.

मुंबई हे अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या वाटेवर आहे का हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. न्यूयॉर्कमध्ये 3 लाख 81 हजार 714 रुग्ण सापडले असून 24 हजार 495 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील एकूण बळींच्या 22 टक्के प्रमाण न्यूयॉर्कमधील आहे.

लोकसंख्येची घनता

मुंबई घनदाट लोकसंख्या असलेले शहर आहे. तेथे सुमारे 2 कोटींची लोकसंख्या 600 चौरस किलोमीटरमध्ये राहते. दर एका किलोमीटरच्या कक्षेत 33 हजारांपेक्षा अधिक लोक राहतात. तर न्यूयॉर्कची लोकसंख्या 85 लाखांच्या आसपास आहे. तेथे प्रत्येक किलोमीटरच्या कक्षेत 10 हजारांपेक्षा अधिक लोक राहतात.

रुग्णवाढीचा वेग

नव्या बाधितांचा वेग न्यूयॉर्कमध्ये ओसरू लागला आहे. मात्र मुंबईत हा वेग सातत्याने वाढत आहे. यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये प्रतिदिन 8 हजार ते 11 हजारांदरम्यान नवे रुग्ण सापडत होते. तर मागील 14 दिवसांमध्ये 1500 पेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत 17 मेपासून दररोज हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत.

चाचण्यांचे प्रचंड प्रमाण

न्यूयॉर्कमध्ये 11 जूनपर्यंत 28 लाख 1 हजार 400 जणांची चाचणी झाली आहे. तर 12 जूनपर्यंत मुंबईत 2 लाख 47 हजार 696 जणांची चाचणी करण्यात आली आहे. म्हणजेच न्यूयॉर्कच्या तुलनेत मुंबईत केवळ 8.84 टक्के चाचण्या झाल्या आहेत. न्यूयॉर्कचा पॉझिटिव्हिटी रेट 13.6 टक्के तर मुंबईचा 21.79 टक्के आहे. 12 जूनपर्यंत मुंबईत दर 10 लाख लोकसंख्यमागे 19 हजार 42 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. तर न्यूयॉर्कमध्ये हाच आकडा 1 लाख 44 हजार 14 राहिला आहे.

बळी अन् वयोगट

मुंबईत 1 हजार 42 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 77 टक्के जणांचे वय 50 किंवा त्याहून अधिक होते. न्यूयॉर्कमध्ये 24 हजार 495 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथे 23 हजार 216 बळी पडलेले लोक 50 पेक्षा अधिक वयोगटातील होते. हे प्रमाण 95 टक्के आहे.

रुग्णालये अन् बेड्सची संख्या

आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य सुविधेला तीन शेणींमध्ये विभागले आहे. पहिल्या शेणीत समर्पित कोविड रुग्णालय असून तेथे गंभीर रुग्णांवर उपचार होणार आहेत. दुसऱया शेणीत कोविड हेल्थ सेंटर असून तेथे कमी गंभीर असलेल्या रुग्णांना दाखल केले जाते. तिसऱया शेणीत कोविड केयर सेंटर असून तेथे लक्षणेरहित रुग्णांना ठेवण्यात येते. मुंबईत 12 जूनपर्यंत या तिन्ही शेणींमध्ये 17 हजार 848 बेड होते, यातील 13 हजार 256  म्हणजेच 76 टक्के बेड्सवर रुग्ण होते. यातील 1 हजार 197 आयसीयू बेड असून आता केवळ 20 बेडच रिक्त आहेत. तर 5 हजार 325 ऑक्सिजन बेडपैकी 4 हजार 80 आणि 538 व्हेंटिलेटर्सपैकी 515 बेड्स वापरात आहेत.

Related Stories

सलग 17 व्या दिवशी इंधन दरवाढ

Patil_p

3 पिढय़ांपासून गावात नाही प्रचाराची अनुमती

Patil_p

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईत अटक

datta jadhav

पंतप्रधान मोदींनंतर ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरोनाची लस

pradnya p

कोरोनावरील भारतीय लस स्वातंत्र्य दिनी रुग्णसेवेत

Shankar_P

निर्भया केस : एका आरोपीकडून क्युरेटिव्ह याचिका दाखल

prashant_c
error: Content is protected !!