तरुण भारत

सर्बियाच्या जोकोव्हिचचा पराभव

वृत्तसंस्था/ बेलग्रेड

सर्बियात आयोजिलेल्या मदतनिधी टेनिस स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या एकेरीच्या सामन्यात टॉप सीडेड जोकोव्हिचला पराभवाचा धक्का बसला. एकेरीतील दोनपैकी एक सामना जोकोव्हिकने गमविला.

Advertisements

या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यात जोकोव्हिचने आपल्याच देशाच्या व्हिक्टर ट्रोस्कीचा पराभव केला. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात क्रेजोनोव्हिकने जोकोव्हिचचा 2-4, 4-2, 4-1 असा पराभव केला. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात ऑस्ट्रीयाच्या थिएमने झुमुरचा पराभव केला. दुखापतीमुळे झुमुरने या सामन्यातून माघार घेतली. त्यानंतर थिएमने लेजोव्हिकचा 1-4, 4-1, 4-3, बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने लेजोव्हिकचा 4-1, 4-3, व्हेरेव्हने क्रेजेनोव्हिकचा 0-4, 4-3, 4-3 असा पराभव केला.

ऍड्रिया टूरवरील होणाऱया माँटेनीग्रो येथील या स्पर्धेतील 27-28 जून रोजी होणारा तिसरा टप्पा रद्द करण्यात आल्याने जोकोव्हिचने नाराजी व्यक्त केली. मदतनिधी सदर टेनिस स्पर्धा चार टप्प्यात खेळविली जाणार होती. कोरोना प्रसारामुळे पुन्हा सर्बियात काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. सर्बियात आतापर्यंत कोरोनाचे 253 बळीं नोंदविले गेले असून सुमारे 12,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

Related Stories

टी-10 क्रिकेट ऑलिम्पिकसाठी योग्य

Patil_p

निवड समिती सदस्यांसाठी सुरिंदर अमरनाथचा अर्ज

Patil_p

अमेरिकेतील एफ-वन शर्यती रद्द

Patil_p

कॅरोलिना मरिनचा ऑलिम्पिक सहभाग अनिश्चित

Patil_p

विंडीजचा न्यूझीलंड दौरा सुरु राहणार : मंडळ

Omkar B

अखेर हॉकीपटूंना मिळाला एक महिन्याचा ‘ब्रेक’

Patil_p
error: Content is protected !!