तरुण भारत

विमानतळावरून दिवसभरात 14 उड्डाणे

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावच्या सांबरा विमानतळावर प्रवाशांचा ओढा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर 20 दिवसांपासून विमानसेवा पूर्वपदावर येत आहे. शनिवारी दिवसभरात 14 विमानांची उड्डाणे झाली. बेंगळूर, पुणे, अहमदाबाद, म्हैसूर, इंदूर, मुंबई, हैदराबाद या शहरांना उड्डाणे झाली. एकूण आजवरच्या सर्वाधिक 524 प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची नोंद झाली आहे.

Advertisements

लॉकडाऊनला सुरुवात होताच पूर्णपणे बंद असलेली विमानसेवा 25 मेपासून पूर्ववत झाली आहे. बेळगावमधून सेवा देणाऱया सर्वच विमान कंपन्यांनी आपली सेवा पुन्हा सुरू केली आहे. इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी रस्ते व रेल्वेमार्गे प्रवासी वाहतूक अद्याप सुरळीत झालेली नसल्याने विमानसेवेला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. दररोज प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.

बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा देण्यात आली आहे.  विमानतळावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. एका विमानाचे उड्डाण होताच संपूर्ण विमानतळ टर्मिनल सॅनिटाईज केले जात आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग करूनच प्रवाशांना बाहेर सोडण्यात येत आहे. महाराष्ट्रातून येणाऱया प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे. 

Related Stories

खानापूरात बुधवारी आणखी 9 रूग्णांची भर

Rohan_P

स्वराज्य श्री आंतर जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 13 रोजी

Amit Kulkarni

शहर परिसरात डेंग्यूचाही धोका

Amit Kulkarni

संत रोहिदासनगर येथील धोकादायक विद्युतखांब हटवा

Amit Kulkarni

मुतगा येथे ता.पं.फंडातून साडेचार लाखांचा निधी

Patil_p

भुतरामहट्टी अपघातातील आणखी एका तरुणाचा मृत्यू

sachin_m
error: Content is protected !!