तरुण भारत

कोरोना रुग्णांचा आकडा 490

रविवारी सापडले 41 रुग्ण : एकटय़ा मांगोरहिलचे 29

प्रतिनिधी / पणजी

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पाचशेच्या जवळ पोहोचला असून 490 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. काल रविवारी नव्याने 41 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 29 रुग्ण हे हॉटस्पॉट ठरलेल्या मांगोरहिलचे आहेत तर केपे येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. गोव्यातील लोकांनी आता कोरोनासोबत जगायचे आहे, हे रोजच्या वाढत्या आकडय़ांवरून स्पष्ट होऊ लागले आहे.

मांगोरहिलची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मांगोरहील येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 272 एवढी झाली आहे तर मांगोरहिलशी संबंधित अन्य भागातील आकडा 147 वर पोहोचला आहे. नवेवाडे वास्को येथील रुग्णांची संख्या 12 झाली आहे तर बायणा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 झाली आहे. मोर्ले सत्तरी येथे 17 तर चिंबल येथे 11 व सडा वास्को येथे 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

विमान, रेल्वे व रस्ता वाहतुकीद्वारे गोव्यात आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुणांची संख्या 67 एवढी आहे तर 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल एकूण 1967 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी 1621 अहवाल निगेटिव्ह आलेत तर 42 जणांना कोरोनाची बाधा झाली. अजून 305 चाचण्यांचे अहवाल यायचे आहेत. 1110 जणांना हॉटेल व रेसिडन्सीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनासोबत किती काळ जगायचे ?

आता लोकांनी कोरोनासोबत जगायचे आहे, हे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. देशभरातील कोरोनाबाधितांचा दैनंदिन वाढता आकडा पाहता व शेजारील महाराष्ट्राची भयानक स्थिती पाहता हे वास्तव वाटत आहे. गोव्यातही आता तीच मानसिकता बनत आहे. सरकारनेही हे वास्तव मान्य केले आहे. गोव्याबाहेरून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरूच आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व अन्य राज्यांतील वाहने गोव्यात फिरताना दिसतात तर दुसऱया बाजूने गोव्यात आता रोज 40 प्नाक्षा जास्त नवीन रुग्ण सापडत आहेत. वास्को सध्या कोरोना हॉटस्पॉट बनला आहे. गोवाभरात विविध भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोरोनासोबत जीवन जगण्याची पाळी गोमंतकीयांवर येण्याची शक्यता आहे मात्र किती काळ कोरोनासोबत जगायचे यावर विचार होण्याची गरज आहे.

व्हेंटिलेटरवरील त्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा

प्रतिनिधी / मडगाव

हृदयविकाराचा झटका आल्याने गोमेकॉत दाखल करण्यात आलेल्या व नंतर कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या त्या रूग्णाला कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी हा रूग्ण व्हेंटिलेटरवर होता. मात्र, रविवारी त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून त्याचा व्हेंटिलेटरचा आधार काढून घेण्यात आला आहे.

शनिवारी त्याची प्रकृती नाजूक असल्याने, कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी देखील चिंता व्यक्त केली होती. मात्र, या रूग्णाच्या प्रकृतीत रविवारी लक्षणीय सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी देखील समाधान व्यक्त केले. काल या रूग्णाचा व्हेंटिलेटरचा आधार काढण्यात आला.

बाळ निघाले निगेटिव्ह

शुक्रवारी मडगावच्या कोविड हॉस्पिटलात एका बाळाचा जन्म झाला होता. या बाळाची आई कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यामुळे या बाळाला गोमेकॉत पाठविण्यात आले होते. तेथे या बाळाची कोरोना चाचणी घेण्यात आली असता हे बाळ निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे बाळ निगेटिव्ह आल्याने त्याला आपल्या आईकडे पाठविले जाणार नाही. कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहिती नुसार हे बाळ त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले जाणार आहे.

कोविड हॉस्पिटलातील कर्मचारी निगेटिव्ह

दरम्यान, कोविड हॉस्पिटलातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्याला कोविड हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. या कर्मचाऱयाच्या संपर्कात आलेले दोन कुक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे कोविड हॉस्पिटलातील इतर कर्मचाऱयांची स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल उपलब्ध झाला असून सर्व जण निगेटिव्ह निघाले आहेत.

Related Stories

शॅकच्या सांडपाण्याची विल्हेवाट पर्यटन खात्याने लावावी

Patil_p

जत्रोत्सवांवर कोरोनाचे नियंत्रण

Patil_p

ऑक्टोबरमध्ये पाच दिवसांचे अधिवेशन घ्यावे

Patil_p

कारापूर सर्वणच्या प्रभाग 2 साठी एकूण 5 अर्ज दाखल

Amit Kulkarni

खलाशांच्या नातेवाईकांचे उपोषणाचे अस्त्र

Omkar B

मोरपिर्ला क्षेत्रात आजपासून 14 दिवस ‘स्वेच्छा लॉकडाऊन’

Omkar B
error: Content is protected !!