तरुण भारत

अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार : राहुल गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा सरकारवर ट्विट करत टीका केली आहे. 

Advertisements


राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, भारतामध्ये लावलेल्या लॉक डाऊनने दाखवून दिले की, अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार आहे. 


पुढे त्यांनी म्हटले की, हे वाक्य महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे आहे. तसेच यावेळी त्यांनी लॉक डाऊनच्या चारही टप्प्यात कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू आणि रुग्णांचे वाढलेले प्रमाण तसेच अर्थव्यवस्थेचा ग्राफ देखील शेअर केला आहे. 


आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसापासून देशात कोरोनाचे दररोज 11 हजार पेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. सोमवारी देशात कोरोना बाधितांचा एकूण आकडा 3 लाख 23 हजार 442 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 9 हजार 520 लोकांचा मृत्यू झाला आहे. 


दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून ब्राझील आणि रुस या आकडेवारीत दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. तर यानंतर चौथ्या कामावर भारत देश आहे. 

Related Stories

18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर

Patil_p

अमरावतीमध्ये कोरोनाचा पहिला बळी

prashant_c

तेलंगणात पूरस्थिती, ओडिशात ऑरेंज अलर्ट

Patil_p

सुबोध भावेसह पत्नी आणि मोठ्या मुलाला कोरोनाची बाधा

pradnya p

आरबीआय पतधोरण आज जाहीर होणार

Patil_p

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

pradnya p
error: Content is protected !!