तरुण भारत

सातारा शहर, परिसरात पाच बाधित

● सातारा शहराला धडकी,
● जिल्हय़ात 25 जण झाले कोरोनामुक्त,
● उपचारार्थ रुग्णांची संख्या 178 वर
● दोघांचा सारीने मृत्यू


प्रतिनिधी/सातारा

जिह्यात कोरोनाचे आजमितीस 745 झाले असले तरी सातारा शहर मात्र कोरोनामुक्त होते. मात्र रविवारी 1 तर सोमवारी 1 असे शाहूनगर व मंगळवार पेठेतील दोनजण बाधित सापडले तसेच सोमवारी वर्ये, ता. सातारा तर शाहूपुरीतील निसर्ग कॉलनी व क्षेत्रमाहुलीत एक असे एकूण 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सातारा शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्ह्यात आज सात जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून दोघांचा सारीने मृत्यू झाला असून त्यांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

*शाहूनगरात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ*

शाहूनगरमधील दत्त कॉलनीत सोलापूरहून प्रवास करुन आलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती ही मूळची सोलापूर शहर येथील रहिवासी आहे. शाहूनगर येथील अंत्यविधीसाठी ते साताऱयात आले होते तर मंगळवार पेठेतील रहिवासी मात्र कोरगावला आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत असलेली महिला बाधित आढळून आहे. दरम्यान सातारा शहरानजिक असलेल्या वर्ये येथे एक युवक पुण्याहून आला होता. तो गावात समारंभानिमित्त फिरला होता. अनेकजण त्याच्या संपर्कात आले होते. तो पॉझिटिव्ह आढळून आला असून त्याच्यावर ससूनमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र त्याच्यामुळे वर्ये गावातील 35 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

*सातारा शहराला धडकी*

कोरोनामुक्त असलेल्या सातारा शहर व परिसरात बाधित रुग्ण आढळून आल्याने पुन्हा सातारा शहराला धडकी भरली असून शहरातील हे सर्व परिसर कंटेन्मेंट करण्याची प्रक्रिया सुरु होती.


*पालिकेकडून तातडीने उपाय योजना*

मंगळवार पेठ ही शहरातील सर्वात मोठी पेठ आहे. याच पेठेतील होलार समाज मंदिर परिसर आता कंटेंमेंट झोन करण्याची प्रक्रिया सोमवारी सकाळी सुरू झाली होती. मंगळवार पेठ व शाहूनगरमधील हे दोन्ही भाग सॅनिटराईज करण्यासाठी पालिकेच्या दोन टीम करण्यात आल्या असून प्रशासकीय यंत्रणा अर्लट झाल्या आहेत. नागरिकांनी अकारण भिवून जाण्याऐवजी योग्य त्या काळजी घ्याव्यात, असे आवाहन पालिका सीईओ शंकर गोरे यांनी केले आहे.

*सर्वांनी सवयभान बाळगलेच पाहिजे*

शहरात सध्या सवयभान चळवळ सुरू झाली असून सातारकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र ही चळवळ आता केवळ सांगून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृतीतून त्यात सहभागी होण्याची वेळ आली आहे. आता शहरवासियांवर जबाबदारी वाढली असून पुढील काळात नागरिकांनी मास्क वापरणे, गर्दी टाळणे, हात स्वच्छ धुवणे, विनाकारण न फिरणे, प्रतिकार शक्ती टिकवून ठेवण्यासाठी योग्य आहार, विहार या सवयी लावून घेवून सवयभान बाळगलेच पाहिजे.

*जिल्ह्यात 7 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह*

सोमवारी कोरोना बाधित रुग्णांमध्ये सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 46 वर्षीय महिला व क्षेत्रमाहूली येथील 50 वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी येथील 65 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 60 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील झगलवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील दहिवडी येथील 60 वर्षीय पुरुष व किरकसाल येथील 49 वर्षीय यांचा समावेश आहे.


*बाधित ठरलेल्या युवकाने वाढल्या होत्या पंगती*

वर्ये, ता. सातारा येथील एक युवक पुण्यात कामाला आहे. तो दोन दिवसांपूर्वी वर्ये येथे त्याच्या भावकीतील कार्यक्रमासाठी आला होता. यावेळी त्याने पंगतीही वाढल्या होत्या तर अनेकांच्या संपर्कात तो आला होता. मात्र, तो पुण्याला गेल्यानंतर पॉझिटिव्ह आला असून यामुळे वर्येकरांच्या काळजात धडकी भरली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम सुरु केले असून त्याच्या पुण्यातील रुममधील बाधितांच्या संपर्कात तो आला होता.

*जिल्हय़ातील 25 जण कोरोनामुक्त*

सोमवारी 25 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून, आज अखेर जिह्यात 533 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 180 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये कृष्णा मेडिकल हॉस्पिटलमधून कराड तालुक्यातील वडगांव (उंब्रज) येथील 49 वर्षीय महिला, तुळसण येथील 60, 50, 26 व 65 वर्षीय महिला तर 26 व 30 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील कोर्टी येथील 45 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरुष असे एकूण 9 रुग्ण. बेल एअर पाचगणी येथे दाखल असणारे जावली तालुक्यातील कावडी येथील 18 व 47 वर्षीय पुरुष आणि 58 वर्षीय महिला व 15 वर्षाची मुलगी असे एकूण 4 रुग्ण. फलटण कोरोना केअर सेंटर मधून तालुक्यातील सस्तेवाडी येथील 38 व 25 वर्षीय महिला जोरगांव येथील 21 व 12 वर्षीय तरुण असे एकूण 4 रुग्ण. पाटण कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणाऱया आडदेव ता. पाटण येथील 25 वर्षीय तरुण. वाई कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणाऱया धावडी ता. वाई येथील 48 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय पुरुष असे एकूण 2 रुग्ण. ब्रम्हपूरी कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणाऱया ता. कोरेगांवचे पिम्पोडे येथील 53 वर्षीय पुरुष, वाघोली येथील 53 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय महिला असे एकूण 3 रुग्ण. मायणी मेडिकल कॉलेज कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणाऱया खटाव तालुक्यातील कलेढोण येथील 42 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिला असे एकूण 2 रुग्ण यांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

*जिल्ह्यात एका पुरुषाचा व महिलेचा मृत्यू*

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात सारीचे रुग्ण म्हणून दाखल असणाऱ्या वारुंजी ता. कराड येथील 50 वर्षीय पुरुषाचा आणि कण्हेर ता. सातारा येथील 61 वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला असून या दोघांचे घशातील नमूने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

*160 जणांच्या घशातील नमुने तपासणीसाठी*

क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 19, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 42, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 12, उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 3, ग्रामीण रग्णालय, कोरेगाव येथील 7, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 5, शिरवळ येथील 11, रागगांव येथील 2, पानमळेवाडी येथील 8, मायणी येथील 27, महाबळेश्वर येथील 12, पाटण येथील 3 व दहिवडी येथील 7 अशा एकूण 158 नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणीसाठी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन.सी.सी. एस. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

*जिल्हय़ात सोमवारपर्यंत*

एकूण कोरोनाबाधित : 745
एकूण कोरोनामुक्त : 533
बळी : 34
आजवर निगेटिव्ह : 8,115

*सोमवार*

एकूण कोरोनाबाधित : 07
एकूण कोरोनामुक्त : 25
बळी : 00

Related Stories

अवजड वाहन वापराच्या नियमात बदल

triratna

कोरोनाकडे दुर्लक्ष; इटलीच्या पंतप्रधानांची तीन तास चौकशी

datta jadhav

सातारा : कोरोना लढाईत ‘राहत केअर सेंटर’चे मोलाचे योगदान – ना. बाळासाहेब पाटील

triratna

ओडिशात कोरोनाचा पहिला बळी

prashant_c

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

datta jadhav

दिल्ली धावतेय, सातारा बंद का?

Patil_p
error: Content is protected !!